विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे 100 चे गणित साधून घेतल्यानंतर नानांचा पुन्हा प्रहार राऊत यांनी बोलणे बंद करावे सांगून केला वार!!
त्याचे झाले असे :
महाविकास आघाडीतल्या जागावाटपात शरद पवारांनी 85 च्या खोड्यात अडकवून देखील काँग्रेसने स्वतःचे 100 चे गणित साधून घेतले आणि त्यानंतर नाना पुन्हा मैदानात आले. त्यांनी संजय राऊत यांना बोलणे बंद करण्याचा प्रेमाचा सल्ला दिला.
महाराष्ट्रातल्या जागावाटपात अजून काही जागा शिल्लक आहेत. त्यावर वाद आहेत. काही जागा प्रिंटिंग मिस्टेकने काँग्रेसने स्वतःकडे घेतल्या आहेत. काँग्रेसचे दिल्लीतलेच नेते त्याबद्दल ठरवतील, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. त्यावर राऊत यांनी जागावाटपावर बोलणे आता बंद करावे, असा प्रेमाचा सल्ला नाना पटोले यांनी दिला.
महाविकास आघाडीतल्या जागावाटपाच्या वाटाघाटी मध्ये संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या जुंपलीच होती. नाना पटोले विदर्भातल्या जागांवरून ताणून धरत होते. त्यामुळे राऊत चिडले होते. आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेत नानाच नकोत, अशी भूमिका राऊत यांनी घेतली होती. त्यावर काँग्रेसमध्ये बराच खल झाला. शेवटी काँग्रेसने बाळासाहेब थोरातांना मातोश्री आणि सिल्वर उपवर पाठविले. त्यातच पवारांनी 85 जागांचा खोडा टाकला. यात महाविकास आघाडी बऱ्यापैकी गाळात रुतली. पण दरम्यानच्या काळात राहुल गांधींनी जागा वाटपात पर्सनली लक्ष घातले. काँग्रेसने 101 जागांवर आपले उमेदवार जाहीर करून पवारांवर देखील मात करून दाखवली. कारण पवारांना काँग्रेसला डबल डिजिट जागांवर आणून ठेवायचे होते, पण ते त्यांना जमले नाही. आजच्या पत्रकार परिषदेत तर पवारांनी हा विकासासाठी नेमके कोण किती जागा लढवणार??, या सवालावर हातच वर करून टाकले.
त्यानंतर नाना पटोले पुढे आले. संजय राऊत यांनी जागा वाटपावर बोलणे थांबवावे. त्यापेक्षा आपल्या समान शत्रूशी लढण्यावर लक्ष केंद्रित करावे. विदर्भात त्यांच्या शिवसेनेला एकच जागा मिळाली याबद्दल त्यांना वाईट वाटले, तर ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. काँग्रेसला देखील 10 – 12 जिल्ह्यांमध्ये उमेदवार देता आले नाहीत, पण महाविकास आघाडीत असे राजी – नाराजी चालणारच, ती सहन करावी लागते, असा टोला नानांनी संजय राऊत यांना हाणला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App