विशेष प्रतिनिधी
नागपूर : नागपुरात औरंगजेब प्रेमींनी केलेल्या दंगली बाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून वेगळ्याच संशयाची पेरणी झाली. नागपूरच्या दंगलीमागे प्रशांत कोरटकर तर नाही ना, असा संशय अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. पण प्रत्यक्षात नागपूरच्या दंगलीचा मास्टर माईंड वेगळाच निघाला. फहीम खान शमीम खान असे त्याचे नाव समोर आले. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा तो म्हणे नागपूर शहराध्यक्ष निघाला.
नागपूर पोलिसांनी दंगलीची कसून चौकशी आणि तपास केल्यानंतर फहीम खान शमीम खान हाच दंगलीचा मास्टर माईंड असल्याचे स्पष्ट झाले. नागपूर पोलिसांनी एफ आय आर मध्ये त्याची नोंद करून त्याविषयीची तपशीलवार माहिती दिली. नागपूर कोर्टाने 46 आरोपींपैकी 19 आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची भाषा करणाऱ्या हिंदूंना धडा शिकवण्यासाठी फहीम खान शमीम खान याने जमाव जमवून मोर्चा काढला. त्यामध्ये शस्त्रास्त्रे जमवून हिंसाचार घडवला. याची नोंद नागपूर पोलिसांनी एफआयआर मध्ये केली.
नागपूर मध्ये बाहेरून माणसे आणून हिंसाचार घडवण्याचा आरोप भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केला होता. नागपूरच्या दंगलीमागे प्रशांत कोरटकरच नाही ना, त्याचा तपास केला पाहिजे, अशी संशयाची पेरणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली होती. पण प्रत्यक्षात फहीम खान शमीम खान हाच मास्टर माईंड ठरला. याच फहीम खानने विश्व हिंदू परिषदेने बजरंग दल यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्यांनी 30-40 जणांचा जमा पोलीस ठाण्यात नेला होता. नंतर सायंकाळी त्यानेच सगळ्यांना जमवून नागपूरच्या महाल भागात हिंसक दंगल घडवली.
फहीम खान दहावीपर्यंत शिकला असून तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा नागपूर शहराध्यक्ष आहे. त्याने विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. मात्र त्यात त्याचा पराभव झाला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App