चुकीच्या कामांवर बुलडोझर चालवू, नागपूर दंगेखोरांच्या प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करू; मुख्यमंत्री फडणवीसांचा दणका!!

Nagpur violence a

विशेष प्रतिनिधी

नागपूर : नागपूर मध्ये दंगल घडवणाऱ्या सगळ्या आरोपींकडून दंग्यातली नुकसान भरपाई वसूल करू. त्यांनी नुकसान भरपाईचे पैसे भरले नाहीत, तर प्रसंगी त्यांच्या प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करू, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिली. चुकीचे काम झाले असेल तिथे बुलडोझर चालवू, असेही ते म्हणाले. Nagpur violence about Press conference devendra fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीला वरिष्ठ सनदी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले :

नागपूर मध्ये दंगा घडविणाऱ्या कुठल्याही आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा केल्याशिवाय सरकार सोडणार नाही. नागपूर मधल्या दंग्यात झालेले नुकसान दंगेखोरांकडून वसूल करू. त्यांनी नुकसान भरपाईचे पैसे दिले नाहीत तर दंगेखोरांच्या प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाईचे पैसे वसूल करून घेऊ. जिथे चुकीचे काम झाले असेल, तिथे बुलडोझर देखील चालवू.

आतापर्यंत पोलिसांनी 104 आरोपींना अटक केली आहे. अजूनही तपास आणि सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण सुरू आहे. आणखी काही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात लवकरच येणार आहेत. आरोपीचे बाहेरच्या देशातले कुठले कनेक्शन अद्याप सापडलेले नाही, पण त्याचे मालेगाव कनेक्शन सापडले आहे.

दंगेखोरांनी अफवा पसरवून आणि प्लॅनिंग करूनच दंगे घडविले हे तपास आणि चौकशीत उघड झाले आहे. दंगे भडकविणाऱ्या सोशल मीडियाच्या 64 पोस्ट आयडेंटिफाय होऊन त्या डिलीट झाल्या आहेत. सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्यांना सहआरोपी करून कायद्यानुसार कठोरातली कठोर शिक्षा करू.

राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवणारा कुठल्याही जातीचा अथवा धर्माचा असेल तरी त्याला सरकार सोडणार नाही. काँग्रेसने नागपूर दंगलीचे सत्य तपासण्यासाठी नेमलेल्या समितीत अकोला दंगलीचा मुख्य आरोपी आहे. हा काँग्रेसचा अल्पसंख्याकांचे पाय चाटण्याचा प्रकार आहे.

पोलिसांनी नागपूरची दंगल चार ते पाच तासांमध्ये आटोक्यात आणली. त्या दंगलीचा नागपूर मधल्या 80 % भागावर काही परिणाम झाला नव्हता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आगामी नागपूर दौरा निर्वेधपणे पार पडेल. त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

Nagpur violence about Press conference devendra fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात