विशेष प्रतिनिधी
मुंबई : मास्टर माईंडने कितीही केली रेटा-रेटी, जाती-जातींमध्ये लावली भांडा-भांडी; तरी विरोधी बाकच महाविकास आघाडीच्या नशिबी!!, अशी अवस्था निवडणुकीनंतर होणार असल्याचा दावा एका सर्वेक्षणातून समोर आला आहे.
आयएएनएस आणि मॅट्रिज यांनी केलेल्या महाराष्ट्रातल्या सर्वेक्षणामध्ये महायुतीला बहुमता पेक्षा जास्त जागा मिळून ते सत्तेवर येतील, तर महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळून त्यांना विरोधी बाकावर बसावे लागेल, असा निष्कर्ष काढला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महायुतीवर मात केली होती. 48 पैकी तब्बल 31 जागा मिळवल्या महायुतीला जागांचा मोठा फटका बसून त्यांच्या वाट्याला फक्त 17 जागा आल्या परंतु मतांच्या टक्केवारीत मात्र 0.39 % एवढाच फरक राहिला होता, पण आता गेल्या चार महिन्यांमध्ये महायुतीतल्या घटक पक्षांनी विशेषतः भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मायक्रो लेव्हलवर काम करून आपल्या मतांच्या टक्केवारीत वाढ केल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला 47% मतांसह 145 ते 165 जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला 41 % टक्के मतांसह 106 ते 126 जागा मिळतील, असा निष्कर्ष सर्वेक्षणाने काढला आहे. इतर छोट्या पक्षांना 12 % पर्यंत मते मिळण्याची शक्यता आहे, पण या पक्षांची जागा मात्र 5 पर्यंतच मर्यादित राहू शकते, असेही सर्वेक्षणात नमूद केले आहे. त्यामुळे अपक्षांच्या बळावर काही खेळ करायचा मास्टर माईंडचा इरादा धोक्यात आला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मास्टर माईंडने महाराष्ट्रात खेळ करून पाहिला. तो लोकसभेत काहीसा चालला, पण तो विधानसभेत चालणार नसल्याचा निष्कर्ष वर उल्लेख केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. कारण मराठवाडा वगळता विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई आणि कोकण या सर्व विभागांमध्ये महायुतीला महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांपेक्षा जास्त जागा मिळत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
– विदर्भ : महायुती 27 ते 32, मविआ 21 ते 26
– पश्चिम महाराष्ट्र : महायुती 31 ते 38, मविआ 29 ते 32
– कोकण : महायुती 23 ते 25, मविआ 10 ते 11
– मुंबई : महायुती 21 ते 26, मविआ 16 ते 19
– उत्तर महाराष्ट्र : 14 ते 16, मविआ 16 ते 19
– मराठवाडा : 18 ते 24, मविआ 20 ते 24
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App