महाविकास आघाडीला आणखी एक धक्का; शंभरीच्या खाली आली!!; 9 मते झाली कमी!!

प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना – भाजप युतीच्या शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वास दर्शक ठरावात महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला महाविकास आघाडी शंभरीच्या खाली आली. आघाडीची 9 मते कमी झाली. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते मिळाली होती. पण विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी महाविकास आघाडीच्या बाजूने 99 मते मिळाली. MVA reduced below 100 in trust vote in maharashtra assembly

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक चर्चेचा विषय ठरत होती, त्यामध्ये भाजपने 164 मते मिळवत बाजी मारली. मात्र कालच्या तुलनेत महाविकास आाघाडी म्हणजेच विरोधी पक्षाकडे 9 मतांची कमतरता दिसली. सोमवारी झालेल्या शिरगणती मतदानास महाविकास आघाडीकडे 107 मते होती मात्र आज विरोधी पक्षाकडे कालच्या तुलनेत 9 मते कमी दिसली.


Shivsena – AAP : राणा दाम्पत्य – शिवसेना संघर्षात आम आदमी पार्टी शिवसेनेच्या पाठीशी!!


असे झाले मतदान

बहुमताच्या चाचणीत शिंदे – भाजप आघाडीने 164 मते मिळवली आहेत. तर महाविकास आघाडीच्या पारड्यात केवळ 99 मते पडली आहेत. यामध्ये एमआयएम आणि समाजवादी पक्षाच्या एकूण तीन आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. तर रविवारी झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर निवडून आले. तर त्यांनी शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव केला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नार्वेकरांना 164 तर राजन साळवींना 107 मते मिळाली. तर रईस शेख, अबू आझमी आणि फारूख अन्वर या तीन आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली.

MVA reduced below 100 in trust vote in maharashtra assembly

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात