Election Commission : महाविकास आघाडी – निवडणूक आयोगात आज पुन्हा बैठक; विरोधकांच्या मागण्यांवर आयोग सकारात्मक

Election Commission

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Election Commission लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘मतचोरी’ झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक यंत्रणेतील दोष आणि ईव्हीएममधील कथित गैरव्यवहारांवर चर्चा करण्यासाठी विरोधकांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज (मंगळवार) मुंबईत राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. सुमारे तास-दीड तास ही बैठक झाली. पण आजच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णित राहिल्याने उद्या पुन्हा ही बैठक होणार आहे.Election Commission

जयंत पाटील काय म्हणाले?

चोकलिंगम यांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील मतदारयादीतील घोळ सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी सर्व विरोधीपक्षाच्या वतीने भेट घेतली. राज ठाकरे यांनी अनेक आणलेली निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींची अनेक उदाहरणे पुराव्यानिशी दिलेली आहेत. महाराष्ट्राच्या निवडणूक यादीत प्रचंड गोंधळ असल्याचे बऱ्याच मतदारसंघात दिसतंय. तीच निवडणूक यादी १ जुलैला गोठवून, त्या यादीवर निवडणुका घेतल्या, तर तो गोंधळ पुन्हा चालू होईल, आम्ही याला आक्षेप घेतला आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.Election Commissionमहाराष्ट्राचे बांबू उद्योग धोरण जाहीर; 50000 कोटींची गुंतवणूक; 5 लाख रोजगार निर्मिती


राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून सीईओ चोकलिंगम यांनी एकत्रित यावे आणि आमचे म्हणणे ऐकावे, अशी मागणी आम्ही केली. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की, उद्या ते दोघे एकत्रित येऊन आमचे म्हणणे ऐकतील. आम्ही त्यासाठी सादर केलेले पुरावे त्याची पुन्हा चर्चा होईल. महाराष्ट्रात जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका निवडणुका घेण्याआधी राज्यातील सगळ्या निवडणूक याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. उद्या सकाळी अकरा वाजता आमची पुन्हा बैठक होणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, यशवंतराव चव्हाण सेंटर येथील पत्रकार परिषद होणार नाही. उद्या आमची बैठकीतील निष्कर्षानंतर ती पत्रकार परिषद होईल. आता तिथे कोणतीही पत्रकार परिषद होणार नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

संजय राऊत काय म्हणाले?

चोकलिंगम यांच्यासोबतच्या बैठकीत काही मुद्दे अनिर्णित आहेत. ती चर्चा उद्या परत सुरू राहणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी चोकलिंगम यांची एकत्र भेट आणि चर्चा हे शिष्टमंडळ घेतील. त्यामुळे उद्याच पत्रकारांना भेटून माहिती देऊ, असा निरोप शिष्टमंडळाकडून आलेला आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

आज आम्ही निवडणूक आयोगाला भेटून जी मागणी करतोय, अशीच मागणी भाजपचे लोक पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाकडे करत आहेत. केरळ आणि कर्नाटकमध्येही भाजप अशीच मागणी करतोय. त्याच मागणीसाठी आम्ही निवडणूक आयोगाला भेटत असताना भाजप नेत्यांनी सुद्धा आमच्याबरोबर राहावे, ही आमची भूमिका आहे. देशाचे संविधान आणि लोकशाही यानुसार निवडणुका व्हाव्यात आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही सगळ्यांची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरेंनी उपस्थित केलेले मुद्दे

निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली?
जे आज 18 वय पूर्ण करत आहे, त्यांनी मतदान करू नये का?
दोन दोन ठिकाणी मतदारांचे नाव.
मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ.
वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी.
निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता?
31 जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का?

गुलाबराव पाटलांची विरोधकांवर टीका

पराभव दिसतो तेव्हा कारणे बघावी लागतात. ताकद नसल्यावर रडीचा डाव केला जातो, हा त्यातलाच प्रकार असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

ठाकरे बंधूंचा एकाच गाडीतून प्रवास

ठाकरे बंधू, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात हे निवडणूक अधिकऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. शिवालयातून निघाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला.

अधिकाऱ्यांच्या भेटीपूर्वी शिवालयात खलबते

निवडणूक आयोगात जाण्याआधी शिष्टमंडळाचे सर्व नेते शिवालयात जमले होते. या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची याबाबत चर्चा झाली. दुसरीकडे विरोधकांचे शिष्टमंडळ भेटीला येण्याआधी राज्य निवडणूक आयोगातही अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान ‘मतचोरी’ झाल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याच संदर्भात, निवडणुकीच्या प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल वाढलेल्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने, सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

शिष्टमंडळात कोण-कोण आहेत?

शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील (शेकाप) शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रईस शेख, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे, कॉ. प्रकाश रेड्डी

Election Commission to Hold Second Meeting with MVA Today; Opposition Discusses ‘Vote Theft’ and Voter List Discrepancies

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात