MVA : महायुती सरकारला जोडे मारा आंदोलन; ठाकरे, पटोले, पवार उतरले रस्त्यावर!!

MVA

विशेष प्रतिनिधी

मुंबई : MVA  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट उसळली. नंतर राजकारण उफाळले. महाविकास आघाडीतल्या नेत्यांना महायुतीच्या सरकारला ठोकायची संधी मिळाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जाहीर माफी मागितली. तरीही महायुतीच्या सरकार विरोधात वातावरण तापवत ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने आज जोडे मारो आंदोलन केले. मुंबई पोलिसांच्या परवानगीची वाट न पाहता आज महाविकास आघाडीचे बडे नेते मुंबईमधील हुतात्मा चौकात पोहोचले. कोणत्याही परिस्थितीत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा काढून जाहीर सभा घेण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, महायुतीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रतिआंदोलनाच्या माध्यमातून उत्तर दिले.

जोडे मारा आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार आदित्य  ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यासह अनेक नेते आणि हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. हुतात्मा चौकातून गेट वे ऑफ इंडियापर्यंत त्यांनी मोर्चा काढला. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये महिलांचा सहभाग सुद्धा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. शिवद्रोह्यांना माफी नाही अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

मोर्चाला परवानगी नव्हती

मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडीला (एमव्हीए) आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. यानंतरही विरोधकांनी मोर्चे काढला. विरोधकांच्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे पर्यटकांच्या ये-जा करण्यावर बंदी घातली होती.


Tejashwi Yadav : सॅम पित्रोदा यांचा आत्मा तेजस्वी यादवमध्ये आहे का? – भाजपचा टोला!


मी त्यांना शिवाचा गद्दार म्हणेन, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल 

उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवाजी महाराजांचा पुतळा हवेतून कसा पडला? राज्यात भ्रष्टाचारात गुंतलेले सरकार सुरू आहे. स्मारकाच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. पुनर्बांधणीच्या नावाखाली करोडोंचा भ्रष्टाचार होणार आहे. मी त्यांना शिवाचा गद्दार म्हणेन. शरद पवार म्हणाले की, पुतळ्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. ही बाब गंभीर आहे.

डीजी रश्मी शुक्ला भाजप आणि आरएसएसचा अजेंडा चालवत आहेत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सिंधुदुर्गात पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी स्वत: पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री आले होते. मूर्ती बनवण्याचा नियम आहे, परवानगी घ्यावी लागते. हे शिवविरोधी लोक आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांचे कारण आणि डीजी पदावर महिला अधिकाऱ्याची नियुक्ती का करण्यात आली आहे. डीजी रश्मी शुक्ला भाजप आणि आरएसएसचा अजेंडा चालवत आहेत.

MVA agitation target Mahayuti govt

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात