विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर: Nitesh Rane हिंदू धर्माला जर आव्हान देण्याचे काम केले तर मढी गावाने जसा मुस्लीम व्यापाऱ्यांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय घेतलाय तो निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल, असा इशाराही नीतेश राणे यांनी दिला.Nitesh Rane
मढी गावात हिंदू धर्म सभेत ते बोलत होते. जत्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी घेतला होता. त्यासंदर्भात एक ठराव देखील ग्रामपंचायतीने घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्याला गट विकास अधिकारी (बीडीओ) यांनी रद्द केला. ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. गटविकास अधिकार्यांकडून मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर, पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी वरिष्ठांना चौकशी अहवाल पाठवला असून मुस्लीम व्यावसायिकांना बंदी केल्याचा ठराव रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
मत्स्य व बंदर मंत्री नीतेश राणे ( Nitesh Rane ) सभेत बोलताना मढी ग्रामपंचायतीच्या या ठरावाचे समर्थन करून म्हणाले, मढी गावाने घेतलेला निर्णय इतिहासात लिहिला जाईल. या गावाने जिहाद्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम केले.
नीतेश राणे म्हणाले, मढी गावाने घेतलेला निर्णय इतिहासात लिहिला जाईल, जिहाद्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम मढी गावाने केले. मढी गावातील कडवट विचाराचे हिंदू जागृत झाले. देशाला दिशा देणारा मढी गावाचा निर्णय आहे.
गटविकास अधिकाऱ्याला कळू द्या हे हिंदुत्ववादी सरकार आहे. आम्ही तुमच्या धर्माच्या विरोधात भूमिका घेतली तर तुम्हाला चालेल का?, रामगिरी महाराजांनी जर एखादी भूमिका घेतली तर तुम्हाला मिर्चा का झोंबतात? असा सवालही नीतेश राणे यांनी उपस्थित केला.
हिंदू धर्माला जर आव्हान देण्याचे काम केले तर मढी गावाने जो निर्णय घेतलाय तो निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल, असे आव्हान राणे यांनी दिले. आम्ही आमदार, मंत्री झालो ते हिंदू जनतेने मतदान केले म्हणून झालो. आता मोर्चे काढण्याची, आंदोलनांची गरज नाही. ते दिवस गेले, आता सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे,
मढी गावचा ठराव जरी रद्द झाला तरी पुन्हा ठराव करा आणि सर्व ग्रामस्थांनी त्या ठरावावर सह्या करा. सर्व ग्रामस्थांनी ठरावावर सह्या केल्या की मी बघतो बीडीओ कसा ठराव रद्द करतो, असेही नीतेश राणे म्हणाले.
राज्यातील अनेक ठिकाणी या लोकांनी केलेले अतिक्रमण काढली जात आहेत. ज्या धर्मात मूर्तीपूजेला विरोध आहे, त्या लोकांना आपल्या यात्रेत दुकाने का लावू द्यावी? असा सवाल करत तुम्हाला जर आमच्या धार्मिक ठिकाणी येऊन जिहाद करायचा असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, असे राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App