प्रतिनिधी
पुणे : देशात मोदी सरकार समान नागरी कायदा लागू करण्याची शक्यता असताना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने वेगवेगळ्या शहरांमध्ये ठिकठिकाणी समान नागरी कायद्याविरोधात बोर्ड लावले आहेत. Muslim personal low board on roads in public pleces against equal civil act
केंद्र सरकारने एका विशिष्ट वेबसाईटवर नागरिकांना आणि विविध धार्मिक संघटनांना समान नागरी कायद्यासंदर्भात आपापली मते कळविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यावर त्या वेबसाईटवर जाऊन समान नागरी कायदे विरोधात आपले मत नोंदवावे, असे आवाहन मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने केले आहे.
भारतीय राज्यघटनेत धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क आहे. समान नागरी कायदा लागू केला तर या धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काला धक्का पोहोचतो, असा दावा करून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जास्तीत जास्त मुस्लिम समुदायाने समान नागरी कायदा विरोधात मत नोंदवून केंद्र सरकारला त्याचा विरोध कळवावा असे आवाहन बोर्डाने ठिकठिकाणी लावलेल्या बोर्डावर करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App