विशेष प्रतिनिधी
पुणे : वाळूच्या बेकायदा व्यवसायातील स्पर्धेमधून एका सराईत गुन्हेगाराचा हल्लेखोरांनी सिनेस्टाईल गोळीबार करीत खुन केला. उरुळी कांचन येथील सोनाई हॉटेल जवळ शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. दोन टोळ्यांमध्ये भर दुपारी हा गोळीबार झाला.Murder of a criminal in cinestyle shooting between two gangs, enmity over sand dispute
संतोष जगताप (रा. राहू) असे गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यासोबत त्याचा बॉडीगार्ड देखील गोळीबारात जखमी झाला आहे. संतोष जगताप याच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याने 2012 साली एकाचा खून केला होता.
शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास संतोष जगताप आणि त्याचा बॉडीगार्ड हे कार मधून जात असताना उरुळी कांचन येथील सोनाई हॉटेल जवळ यांच्यावर गोळीबार झाला.अंदाजे चार ते पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. पोलिसांना घटनास्थळी तीन पुंगळ्या मिळाल्या आहेत
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून जखमीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच जगताप याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App