Sahar Sheikh : ‘कैसा हराया’ म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा; ‘मुंब्रा हिरवा’ करण्याची केली होती वल्गना; वाद होताच पोलिसांकडे मागितली माफी

Sahar Sheikh

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sahar Sheikh  ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी ‘कैसा हराया’ म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चिडवले होते. यावेळी त्यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवे करण्याचीही घोषणा केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर अखेर सहर शेखने पोलिसांकडे आपला माफीनामा लिहून दिला आहे. या माफीनाम्यात सहर शेखने आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे.Sahar Sheikh

नगरसेविका सहर शेख यांनी कैसा हराया, अभी हम लोगों को मुंब्रा को पुरा हरा कर देना हैं, असे विधान केले होते. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सहर शेखने आपला माफीनामा लिहून देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील सर्वच तक्रारदारांना त्याची माहिती कळवली आहे.Sahar Sheikh



सहर शेखने मागितली माफी

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन प्रस्तुत प्रकरणाचा आढावा घेतला होता. त्यावेळी शिंदे यांनी सहर शेखच्या चौकशीचा अहवाल सादर केला. सहर शेखने आपल्या विधानाविषयी 23 जानेवारी रोजीच माफीनामा दिला आहे, असे त्यांनी सोमय्यांना सांगितले. मुंब्रा येथील सभेत वापरलेले वाक्य हे पक्षाचा झेंडा व निशाणीच्या संदर्भात होते. या प्रकरणी कुणाचेही मन दुखावण्याचा व सामाजिक वातावरण बिघडवण्याचा हेतू नव्हता. आम्ही तिरंग्यासाठी जगू व तिरंग्यासाठीच मरू.

त्यामु्ळे माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची जाहीर व लेखी स्वरुपात माफी मागते, असे सहर शेखने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे. तिचा माफीनामा स्वीकारल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण दप्तरी नोंदवले आहे. भविष्यात अशा प्रकारचे विधान झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल याची तजवीज या माध्यमातून पोलिसांनी केली आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

किरीट सोमय्या या प्रकरणी एका पोस्टमध्ये म्हणाले, सहर शेखचा “माफीनामा”. AIMIM ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा सहर शेखनी हिंदूंना चिथावणी देणाऱ्या “हम मुंब्रा को हरा बना देंगे” ह्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. मुंब्रा पोलिसांनी माझा तक्रारी नंतर सहर शेखला नोटीस पाठवली होती. मी आज पाठपुरावा साठी मुंब्रा पोलिस स्टेशनला गेलो त्यावेळी ही माहिती मला लिखित स्वरूपात दिली.

आता पाहू नेमका काय आहे वाद?

सहर शेख ह्या ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झाल्या. त्यांचा विजय जेवढा लक्षवेधी ठरला, तेवढीच चर्चा त्यांनी विजयानंतर केलेल्या भाषणाचीही झाली. आपल्या भाषणात त्यांनी ‘कैसा हराया’ म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे सहर शेख हे नाव राज्यभर गाजले. त्यांचे वडील युनूस शेख हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मुंब्रा परिसरात सक्रिय होते. ते मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष म्हणूनही काम करत होते. त्यामुळे यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल असे सांगितले जात होते. जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांना तसा शब्द दिला होता.

पण नंतर त्यांनी तो पाळला नाही. त्यामुळे सहर शेख यांनी एमआयएमकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांचा दणदणीत विजय झाला. पण त्यानंतर झालेल्या विजयी सभेत त्यांनी आव्हाड यांच्यावर टीका केल्यामुळे त्या स्वतःच टीकेच्या धनी बनल्या.

Sahar Sheikh Apologizes for ‘Green Mumbra’ Remark After Police Notice

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात