विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mumbai Wife Suicide नवऱ्याच्या काळ्या कमाईला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची विचित्र घटना मुंबईच्या कांदिवली पूर्व भागातील आकुर्ली येथे घडली आहे. आरोपी पती म्हाडाचा अधिकारी आहे. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीनुसार या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Mumbai Wife Suicide
यासंबंधीच्या माहितीनुसार, रेणू कटरे असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती बापू कटरे हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई विभागात उपनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. रेणू या शिक्षिका होत्या. त्यांनी आपल्या राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली. त्या आपल्या नवऱ्याच्या काळ्या कमाईला वैतागल्या होत्या. त्यांच्या मृत्यू प्रकरणी बापू कटरे व त्यांच्या आई यमाबाई कटरे यांच्याविरोधात समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Mumbai Wife Suicide
दरमहा 40-50 लाख रुपयांची काळी कमाई
रेणू यांच्या भावाच्या तक्रारीनुसार, बापू कटरे हे दरमहा विविध मार्गांनी 40 ते 50 लाख रुपयांची काळी कमाई करत होते. त्यानंतर हा पैसा पांढरा करण्यासाठी रेणू यांच्या वडिलांवर दबाव टाकत होते. रेणू कटरे यांचा या अवैध मार्गाने होणाऱ्या कमाईला विरोध होता. वाममार्गाने आलेल्या या पैशांचा आपल्या मुलांवर वाईट परिणाम होईल अशी भीती त्यांना वाटत होती. पण बापू कटरे हे सतत त्यांना मारहाण करायचे. आमच्या वडिलांवर काळा पैसा पांढरा करण्यासाठी दबाव टाकायचे.
तोडगा काढण्याच्या बैठकीला येण्यास नकार
या तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, बापू कटरे यांचा दबाव व मारहाणीच्या भीतीमुळे माझी रेणू कटरे यांनी 15 ते 20 लाख रुपये पांढरे करण्यास मदत केली. आमचे वडील या प्रकरणी बापू कटरे यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधणार होते. यासाठी त्यांना पुण्यात बोलावलेही होते. पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे रेणू नाराज झाल्या. त्यांचे मनोधैर्य खचले. त्यामुळे 26 जुलै रोजी त्यांनी आपल्या भावाला कॉल केला. बापू कटरे विनाकारण मारहाण व शिवीगाळ करत आहे. बैठकीलाही येण्यास नकार देत आहे. माझा हा त्रास केव्हाच थांबणार नाही असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर रेणू यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरला कॉल केला. पती व सासू माझा छळ करत आहेत असे सांगत त्यांनी आपला फोन ठेवला. त्यानंतर फॅमिली डॉक्टरने रेणू यांच्या आई-वडिलांना कॉल केला. पण त्यांचा कॉल लागला नाही. त्यांना पुन्हा – पुन्हा फोन करण्यात आला. पण त्यांनी तो उचलला नाही. ही बाब त्यांच्या माहेरी कळवण्यात आली. त्यानंतर रेणू यांचे आई-वडील, भाऊ पुण्यावरून मुंबईच्या दिशेने निघाले. त्यानंतर त्यांना रेणू यांनी घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App