Mumbai senate election : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीने ठाकरे सेनेत भरले बळ, अभाविप पराभूत; पण काँग्रेसच्या पोटात कळ!!

Mumbai senate election

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई विद्यापीठातल्या सिनेटच्या निवडणुकीने ठाकरे सेनेत भरले बळ, त्या निवडणुकीत अभाविप झाली पराभूत, पण काँग्रेसच्या पोटात आली कळ!!, असे म्हणायची वेळ आली आहे. कारण मुंबई शहरामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत कुठल्याही छोट्या मोठ्या निवडणुकीत यशाचे बळ भरले गेले, की त्याचा परिणाम महाविकास आघाडीतल्या जागा वाटपावर होणार आणि त्याचा फटका काँग्रेसला जास्त बसणार हे उघड गुपित आहे.

वास्तविक कुठल्या विद्यापीठाची सिनेट निवडणूक ही मतदार संख्येने फार मोठी नसते. पण ही तरुणांची निवडणूक असल्यामुळे त्याची वातावरण निर्मिती मात्र नेहमीच कायम मोठी होत असते. सगळ्या राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना त्यात उतरून आपापल्या पक्षांचे बळ आजमावत असतात.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत अभाविपने युवा सेनेला आव्हान दिले होते. बरीच न्यायालयीन लढाई त्यात झाली होती. त्यामुळे विधानसभा अथवा लोकसभेसारखी निवडणूक असल्याच्या थाटात ती लढवली गेली होती. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 13406 एवढेच मतदार होते. त्यापैकी 55% मतदारांनी मतदान केले होते. म्हणजे साधारण 7500 मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. या निवडणुकीत युवा सेनेने बाजी मारली 10 पैकी 7 जागा जिंकल्या. त्यामुळे ठाकरे सेनेत बळ भरले गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पराभूत झाली.

पण या निवडणुकीचा त्याच्या पुढचा परिणाम म्हणून काँग्रेसला आता जोश भरलेल्या ठाकरे सेनेशी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या वाटाघाटी कराव्या लागणार आहेत. एक – एक, दोन – दोन जागांच्या संघर्षात ठाकरे सेना विद्यापीठातल्या सिनेट निवडणुकीतल्या आपल्या यशाकडे बोट दाखवून काँग्रेस कडून जास्त जागा खेचायचा प्रयत्न करणार आहे. मुंबईतला युवा मतदार ठाकरे सेनेकडे कसा आकर्षित झाला, याचे उदाहरण म्हणून सिनेटच्या निवडणुकीकडे बोट दाखवायला ठाकरे सेना मोकळी झाली आहे. त्यामुळेच या निवडणुकीत अभाविप पराभूत झाली, तरी राजकीय कळ मात्र काँग्रेसच्या पोटात आली आहे.

Mumbai senate election yuva sena win

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात