‘दख्खनची राणी’ म्हणूनही ती ओळखली जाते.नव्या रुपातली डेक्कन क्वीन आता जास्त सुरक्षित, आरामदायी आणि जलद असणार आहे. Mumbai-Punekar’s darling Deccan Queen will be new, more secure, comfortable and faster
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई-पुणेकरांची लाडकी डेक्कन क्वीन नव्या रुपात सज्ज झाली आहे.मुंबई-पुणे या मार्गावर Deccan Queen या गाडीची सेवा ०१ जून १९३० सालापासून सुरू आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे गाड्यांमध्ये डेक्कन क्वीनचा नंबर वरचा लागतो.’दख्खनची राणी’ म्हणूनही ती ओळखली जाते. नव्या रुपातली डेक्कन क्वीन आता जास्त सुरक्षित, आरामदायी आणि जलद असणार आहे.
डेक्कन क्वीनमध्ये डायनिंग कार म्हणजेच हॉटेलसारखी सुविधा अनुभवता येणार आहे.प्रवास करताना अनुभव आता मुंबई-पुणे मार्गावरही उपलब्ध होतील.Deccan Queen च्या नवीन अवताराचा फायदा मुंबई-पुणे मार्गावर कामासाठी अप-डाऊन करणाऱ्या शेकडो लोकांना होणार आहे.केवळ आरक्षण तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
सुरुवातीला तिला केवळ 7 डबे होते. नंतर ते 12 करण्यात आले आणि आता 17 डबे घेऊन ही गाडी धावते.Deccan Queen ला आता अत्याधुनिक LHB कोच जोडले जाणार आहेत. इतकेच नव्हे, तर या गाडीचा रंग देखील बदलण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App