वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनाचा रुग्ण आढळल्यावर त्याच्यावर तातडीने उपचार करण्याच्या मुंबई पॅटर्नमुळे शनिवार अखेर साडेसहा लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३२६ दिवसांवर गेला आहे. Mumbai Pattern : more Than Six Lakh People Recovered in Mumbai
मुंबईत शनिवारीही रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. शहर उपनगरात १ हजार ८२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ६ लाख ५१ हजार २१६ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे.
त्यामुळे मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या २८ हजार ५०८ रुग्ण उपचाराधीन आहेत. शहर उपनगरात दिवसभरात १२९९ रुग्ण आणि ५२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
आता मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ९६ हजार ३७९ झाली आहे, तर मृतांचा एकूण आकडा १४ हजार ५७४ झाला आहे.१५ ते २१ मेपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२१ टक्के असल्याची नोंद आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App