विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mumbai Municipal मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका भाजप-शिंदेसेना एकत्र लढणार आहे. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. त्यात स्थानिक पातळीवर जागावाटपाचे सूत्र ठरवावे, असेही निश्चित झाले. दरम्यान, २९ मनपातील मतदारांची अंतिम यादी २७ डिसेंबरला प्रसिद्ध करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे १५ ते २० जानेवारीदरम्यान निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.Mumbai Municipal
विविध माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, आधी शिंदेसेनेच्या आमदारांची बैठक झाली. त्यात एकनाथ शिंदे यांनी भाजप किंवा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात काहीही बोलू नका, असे बजावले. त्यानंतर शिंदे-फडणवीसांची दीड तास बैठक झाली. त्यात असे ठरले की, अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काही ठिकाणी युतीसोबत तर काही ठिकाणी विरोधात असेल. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना आणि भाजपत ११५ पैकी ९० हिंदुबहुल जागांची वाटणी होईल. नागपूर येथे झालेल्या शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेते, मंत्री, पदाधिकाऱ्यांनी एकमेकांविरोधात बोलायचे नाही, टीका करायचे नाही हे ठरले आहे. एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत, असेही ठरले. आता निवडणुका युतीतच होणार आहेत, असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. तर भाजपचे नेते, ओबीस विकास मंत्री अतुल सावे म्हणाले की, १४ डिसेंबरनंतर मनपा निवडणुकीच्या सर्व बाबी स्पष्ट होतील.Mumbai Municipal
मनपा मतदार अंतिम यादी २७ डिसेंबरला!
राज्य निवडणूक आयोगाने २९ मनपाच्या मतदार यादी कार्यक्रमाचे नवे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार अंतिम मतदार यादी २७ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
या आदेशाचा अर्थ : २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू शकते आणि १५ ते २० जानेवारीदरम्यान निवडणुका होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App