प्रत्येक टॅबसाठी महापालिका १७ हजार ४०० रुपये मोजणार आहे. टॅब खरेदीसाठी ३८ कोटी ७२ लाख २४ हजार ५५९ रुपयांचा एकूण खर्च केला जाईल.Mumbai Municipal Corporation will give new tabs to 10th standard students in the academic year 2022-23
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना संकटामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. नव्या टॅबमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे सोपे होईल; असे महापालिकेच्या प्रशासनाने सांगितले.दरम्यान मुंबई महापालिका मनपा शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात नवे टॅब देणार आहे.ही योजना राबविण्यासाठी महापालिका १९ हजार ४०१ टॅब खरेदी करणार आहे.
पालिकेच्या शाळांतील मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातील दहावीच्या विद्यार्थ्यांना नवे टॅब दिले जाणार आहेत.प्रत्येक टॅबसाठी महापालिका १७ हजार ४०० रुपये मोजणार आहे. टॅब खरेदीसाठी ३८ कोटी ७२ लाख २४ हजार ५५९ रुपयांचा एकूण खर्च केला जाईल.इडुसपार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून टॅब खरेदी करत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
महापालिकेने आधी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ४४ हजार टॅबची खरेदी केली आहे. आणखी १९ हजार ४०१ टॅबची खरेदी प्रक्रिया लवकरच पूर्ण करुन हे टॅब २०२२-२३ मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना देणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
१)कंपनी एक वर्षाची गॅरेंटी देणार २)प्रत्येक टॅबसाठी महापालिका जास्त पैसे देणार म्हणून कंपनी आणखी चार वर्षांची गॅरेंटी देणार ३)प्रत्येक टॅबमध्ये वर्षभराचा अभ्यासक्रम ४)एका टॅबची मूळ किंमत ११ हजार रुपये आणि अतिरिक्त गॅरेंटी तसेच अभ्यासक्रम अपलोड करण्याचे प्रत्येक टॅबचे आणखी ६ हजार ४०० रुपये याप्रमाणे एकूण १७ हजार ४०० रुपये
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App