7 कोटी रुपयांच्या नोटा मुंबईच्या बाजारात चलनात आणण्याचा डाव या रॅकेटचा होता.पण पोलिसांनी वेळीच हा डाव उधळून लावला. Mumbai: Mumbai police seize counterfeit notes worth Rs 7 crore
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई क्राईम ब्रांचने दहिसर भागात बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे.7 कोटी रुपयांच्या नोटा मुंबईच्या बाजारात चलनात आणण्याचा डाव या रॅकेटचा होता. पण पोलिसांनी वेळीच हा डाव उधळून लावला. पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली आहे.
ही एक आंतरराष्ट्रीय टोळी आहे.मुंबईमध्ये आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.या आरोपींकडून 7 मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App