वृत्तसंस्था
पुणे : मुंबई, पुणे, रायगडसह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या जिल्ह्यात चार दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. Mumbai, Konkan and Pune are likely to receive four days of torrential rains from tomorrow
कोकण आणि सिंधुदुर्ग पट्ट्यात ढग दाटले असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहेत. पुणे, अहमदनगर, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांत मान्सूनने हजेरी लावली. अवकाळी पावसाने फळबागांचे मोठे नुकसान केले आहे. ऐन भुईमूग काढणीला आल्याने शेतकरीही चिंतेत आहे.
मागील दोन दिवसांपासून विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तर धुव्वाधार पाऊस कोसळला असून वाऱ्यामुळे बरंच नुकसान झालं आहे. घरावरील छतं उडून गेली आहेत. पुणे आणि नांदेड जिल्ह्यातही पूर्व मोसमी पावसाने तडाखा दिला आहे.
महाराष्ट्रातही मान्सून लांबणार
केरळात मान्सून उशीरा दाखल होणार आहे. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. कोकणातही दोन दिवस उशीरा मान्सूनचं आगमन होत आहे. कोकणात मान्सून १० जूनला तर मुंबईत १२ जून पर्यंत पोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App