Mumbai fire : मुंबईतील ताडदेव भागातील भाटिया हॉस्पिटलजवळील 20 मजली इमारतीला भीषण आग लागली. आज (शनिवार, 22 जानेवारी) कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 19 हून अधिक जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी 7.30 वाजता इमारतीच्या 18व्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. Mumbai fire State announces Rs 5 lakh compensation to relatives of deceased, Rs 2 lakh compensation from Center
वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईतील ताडदेव भागातील भाटिया हॉस्पिटलजवळील 20 मजली इमारतीला भीषण आग लागली. आज (शनिवार, 22 जानेवारी) कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 19 हून अधिक जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी 7.30 वाजता इमारतीच्या 18व्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, आगीच्या घटनेनंतर तीन रुग्णालयांनी जखमींना दाखल करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीला दुजोरा देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुंबई सेंट्रलमधील वोक्हार्ट आणि रिलायन्स आणि भायखळ्यातील मसीना हॉस्पिटलने जखमींना दाखल करण्यास नकार दिला होता. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ते जखमी रुग्णांना घेऊन गेले तेव्हा या रुग्णालयांनी पैशांची कमतरता आणि कोविड चाचणी अहवाल नसल्यामुळे जखमींना दाखल करण्यास नकार दिला. यानंतर जखमींना नायर रुग्णालयात दाखल करावे लागले.
The fire incident that occurred at the Kamala building in Mumbai's Tardeo area will be investigated. Our guardian minister of Mumbai Suburban Aaditya Thackeray and Mumbai City guardian minister Aslam Shaikh will look into it: Maharashtra Deputy CM Ajit Pawar pic.twitter.com/cwzTFqCk3Q — ANI (@ANI) January 22, 2022
The fire incident that occurred at the Kamala building in Mumbai's Tardeo area will be investigated. Our guardian minister of Mumbai Suburban Aaditya Thackeray and Mumbai City guardian minister Aslam Shaikh will look into it: Maharashtra Deputy CM Ajit Pawar pic.twitter.com/cwzTFqCk3Q
— ANI (@ANI) January 22, 2022
जखमींना दाखल करण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल. या घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपत्कालीन परिस्थितीत जखमींना दाखल करण्यास रुग्णालये नाकारू शकत नाहीत. या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पाठोपाठ मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे घटनास्थळी आले होते. या घटनेची माहिती देताना ते म्हणाले, ताडदेव परिसरातील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीच्या दुःखद घटनेचा मी आढावा घेतला. जखमींवर उपचार सुरू आहेत. आम्ही येथील स्थानिक लोकांशीही बोललो आणि या दुःखाच्या प्रसंगी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. दोन रुग्णालयांनी रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. मात्र, त्या दोन्ही रुग्णालयांनी काही रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार केल्याची माहिती मला दिली आहे.
Mumbai fire State announces Rs 5 lakh compensation to relatives of deceased, Rs 2 lakh compensation from Center
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App