क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता याप्रकरणी उद्या दुपारी 2.30 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे आज सुप्रसिद्ध वकील आणि माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडली. सुरुवातीला एनसीबीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि आर्यनला जामीन देण्यास विरोध केला. आर्यनला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो, असे तपास संस्थेने म्हटले आहे. तो देश सोडून पळून जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.Mumbai cruise drugs case Hearing on bail application of accused Aryan Khan has been adjourned for tomorrow by the Bombay High Court
वृत्तसंस्था
मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता याप्रकरणी उद्या दुपारी 2.30 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे आज सुप्रसिद्ध वकील आणि माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडली. सुरुवातीला एनसीबीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि आर्यनला जामीन देण्यास विरोध केला. आर्यनला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो, असे तपास संस्थेने म्हटले आहे. तो देश सोडून पळून जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
Mumbai drugs-on-cruise case: Hearing on bail application of accused Aryan Khan has been adjourned for tomorrow by the Bombay High Court pic.twitter.com/HMNwwIL4fw — ANI (@ANI) October 26, 2021
Mumbai drugs-on-cruise case: Hearing on bail application of accused Aryan Khan has been adjourned for tomorrow by the Bombay High Court pic.twitter.com/HMNwwIL4fw
— ANI (@ANI) October 26, 2021
प्रत्युत्तरात आर्यनचे वकील रोहतगी म्हणाले की, माझ्या अशिलाविरुद्ध ड्रग्ज घेणे, खरेदी-विक्रीचे कोणतेही प्रकरण नाही. अरबाज मर्चंटव्यतिरिक्त, तो ड्रग लिंक असलेल्या कोणालाही ओळखत नाही. अटक मेमोवरून असे दिसते की आर्यन ड्रग्ज ठेवत होता. माझा क्लायंट कोणत्याही एनसीबी अधिकाऱ्यावर आरोप करत नाही.
ही तरुण मुले आहेत, त्यांना सुधारण्याची संधी द्या
रोहतगी म्हणाले की, माझा साक्षी क्रमांक १ आणि २ म्हणजेच प्रभाकर सेल आणि केपी गोसावी यांच्याशी काहीही संबंध नाही आणि त्यांना ओळखत नाही. रोहतगी म्हणाले की, ही तरुण मुले आहेत. त्यांना सुधारगृहात पाठवले जाऊ शकते. त्यांच्यावर कारवाई होऊ नये. सरकार सुधारणांबद्दल बोलत असल्याचे मी वर्तमानपत्रातही वाचले आहे.
क्रूझवर जाण्यापूर्वीच केली अटक
रोहतगी म्हणाले, आर्यन आणि अरबाज 2 ऑक्टोबरच्या दुपारी क्रूझ टर्मिनलवर पोहोचले होते. एनसीबीचे काही लोक आधीच टर्मिनलवर हजर होते. त्याच्याकडे थोडीफार माहिती होती. माझे क्लायंट आर्यन आणि अरबाज क्रूझवर चढण्यापूर्वी पकडले गेले. माझ्या क्लायंटकडून काहीही वसूल झाले नाही. तो ड्रग्ज घेत होता हेही सिद्ध झालेले नाही. त्याची अद्याप कोणतीही वैद्यकीय चाचणी झालेली नाही.
आर्यन हा क्रूझ पार्टीचा ग्राहक नव्हता
रोहतगी म्हणाले – हे संपूर्ण प्रकरण 2 ऑक्टोबरपासून सुरू झाले. आर्यन क्रूझ पार्टीचा ग्राहक नव्हता. त्यात तो विशेष अतिथी म्हणून उपस्थित होता. त्याला प्रतीक गाबा नावाच्या व्यक्तीने बोलावले होते, जो इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. गाबा आर्यन आणि अरबाज मर्चंटला ओळखत होता.
सुनावणीपूर्वी कोर्टरूममधून गर्दी हटवली
सुनावणी सुरू होण्यापूर्वीच कोर्टरूम एवढी खचाखच भरली होती की, गर्दी हटवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली. कोर्टाने सांगितले की, ज्या केसची सुनाावणी सुरू आहे त्याच्याशी संबंधित लोकांनीच कोर्ट रूममध्ये हजर राहावे. न्यायालयाच्या खोलीबाहेरील लॉबीतूनही गर्दी हटवण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले.
NCBचे आरोप – आर्यन साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो
एनसीबीने हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आर्यनच्या जामिनाला विरोध केला आहे. एनसीबीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी साक्षीदारांसोबत बैठक घेत असून तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत आर्यन जामीन मिळण्यावर साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो. तो देश सोडून पळूनही जाऊ शकतो. तथापि, आता हे प्रकरण उद्या पुन्हा कोर्टापुढे सुनावणीसाठी येणार आहे. यामुळे आर्यनला जामीन मिळतो की नाही, हे उद्याच स्पष्ट होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App