Mumbai BMC : मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर; 11 नोव्हेंबरला सोडत, तर 28 तारखेला अंतिम आरक्षण

Mumbai BMC

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Mumbai BMC मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रतिक्षा असणारी प्रभाग आरक्षण सोडत 11 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, याच दिवशी मुंबईतील 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाईल. यानंतर, 14 नोव्हेंबर 2025 ते 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत सोडतीवर हरकती व सूचना मागवल्या जातील; तसेच 21 नोव्हेंबर 2025 ते 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत या हरकतींवर विचार करून आयुक्त निर्णय घेतील, तर 28 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम आरक्षण जाहीर केले जाणार आहे.Mumbai BMC



प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम खालील प्रमाणे

आरक्षित जागांची संख्या निश्चित करून आयोगाची मान्यता घेणे – 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025

आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे – 6 नोव्हेंबर 2025

आरक्षणाची सोडत आणि निकाल जाहिर करणे – 11 नोव्हेंबर 2025

प्रारुप आरक्षणाबाबत हरकती व सूचना मागवणे – 14 नोव्हेंबर 2025

प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागवण्याची अंतिम तारीख – 20 नोव्हेंबर 2025

हरकती व सूचनांवर विचार करून आयुक्तांनी घ्यावयाचा निर्णय – 21 ते 27 नोव्हेंबर 2025

अंतिम आरक्षण जाहीर करून वृत्तपत्रात प्रसिध्द करणे – 28 नोव्हेंबर 2025

राज्यातील 28 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी देखील प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, येत्या 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणूका घेण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानुसार राज्य निवडणू आयोगाने मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला.

Mumbai BMC Ward Reservation Draw On November 11 Final Reservation List To Be Announced On November 28

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात