प्रतिनिधी
मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीचे उदात्तीकरण करण्याचा घाट घातल्याचे समोर येताच महाराष्ट्रात संतापाची लाट आली आहे. याकूब सारख्या दहशतवादाच्या कबरीचे उदात्तीकरण होताना आधीची सरकारी झोपली होती का?, असा सवाल सोशल मीडियावर अनेक जण विचारत आहेत.Mumbai blast accused Yakub Menon’s grave exhumed!!; Outrage across Maharashtra!!
मुंबईत याच याकूब मेमनने दाऊद इब्राहिमच्या चितावणीने १९९३ मध्ये बॉम्बस्फोट मालिका घडवून आणली होती, त्यामध्ये २५७ निरपराध लोकांचे जीव गेले होते. या प्रकरणात दोषी दहशतवादी याकूब मेनन याला फाशी देण्यात आली. २०१५ साली याकूबला नागपूर जेलमध्ये फाशी दिल्यानंतर त्याला मुंबईतील बडा कबरस्तानमध्ये दफन करण्यात आले. मात्र आता ७ वर्षांनंतर त्या कबरीचे मजारमध्ये रूपांतर करण्याचे कारस्थान सुरू असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी याकूब मेननच्या कबरीचे उद्दात्तीकरण करून अप्रत्यक्षपणे दहशतवाद्याला खतपाणी घातले जात आहे.
याकूबच्या कबरीचे उद्दात्तीकरण
याकूबच्या कबरीच्या भोवती एलईडी लाईट लावून तिच्या भोवती हिरवी चादर गुंडाळण्यात आली आहे. शिवाय या कबरीच्या भोवती अतिरिक्त बांधकाम करण्यात आले आहे.
हे सर्व पाहता याकूब मेननच्या कबरीचे कायमस्वरूपी जतन करण्याच्या हेतूने त्याच्या भोवती पक्के बांधकाम करण्यात आले आहे.
ज्या दहशतवादी याकूब मेनन याच्यामुळे मुंबईतील काही कुटुंबे उद्धवस्थ झाली, १९९३ च्या बॉम्बस्फोटात लोकांचे जीव गेले होते, याची चौकशी केली पाहिजे, खरंतर त्या कबरीवर थुंकले पाहिजे, तिथे उदात्तीकरण करण्यासाठी सजावट करतात, याचे कुणी अधिकार दिले आहेत? याच्या चौकशी करा : नितेश राणे, भाजपा नेते
नियम काय सांगतो?
नियमानुसार एखादी कबर १८ महिन्यानंतर पुन्हा खोदली पाहिजे. कारण तेवढ्या काळात मृतदेह नष्ट झालेला असतो आणि त्यानंतर ती जागा दुसरा मृतदेह दफन करण्यासाठी वापरला जातो. महापालिकेचा असा नियम आहे. मात्र याकूब मेननला २०१५ साली दफन केले, त्याला ७ वर्षे उलटली तरीही. याकूब मेननची कबर जशीच्या तशी आहे किंबहुना त्याच्या भोवती अतिरिक्त पक्के बांधकाम करून ती कबर कायमस्वरूपी करण्याचा प्रयत्न सुरू झाला.
या प्रश्नांची उत्तरे कबरस्थान प्रशासन देणार का?
अशा प्रकारचे देशविरोधी लोक आहेत. तत्कालीन सरकारने या कबरीचे स्मारक होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे होती, तशी घेतली नाही : संदीप देशपांडे, मनसे नेते
दरम्यान परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नसून या ठिकाणी असे काहीही नसल्याचे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App