वृत्तसंस्था
मुंबई : आता एकाच कार्डवर बेस्टबरोबरच रेल्वे आणि मेट्रो प्रवास मुंबईकरांना करता येणार आह़े त्यासाठी बेस्टकडून ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ची सुविधा फेब्रुवारीअखेरपासून देण्यात येणार आह़े. Multiple trips on one card, activities in Mumbai; Best, you can travel by train as well as metro
प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी आणि तिकीट, पास काढताना रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा, यासाठी बेस्ट उपक्रमाकडून ही सुविधा देण्यात येणार आह़े बेस्ट उपक्रमाने २०२० च्या ऑक्टोबरपासून ‘सामायिक कार्ड’च्या चाचणीला सुरूवात केली. त्यास लवकरच अंतिम रुप देताना हे कार्ड प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कार्डद्वारे प्रवाशाला तिकिटाचे पैसे अदा करावे लागतील. त्यासाठी कार्डमध्ये पैसे असणे गरजेचे आहे. हे कार्ड रिचार्ज करता येईल. देशभरात ज्या बस, मेट्रो आणि अन्य परिवहन सेवांमध्ये ‘सामायिक कार्ड’ची सुविधा आहे, तिथे बेस्टच्या कार्डचाही वापर करता येईल, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितल़े
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App