विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Imtiaz Jaleel महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत तलवार नाचवल्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांच्यावर गुन्हा का दाखवण्यात आला नाही? असा सवाल एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मालेगाव महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने एमआयएमचा पाठिंबा मागितल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.Imtiaz Jaleel
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा यांचा छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून विजयी झाल्या आहेत. त्यांनी निवडणूक निकालानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत तलवार नाचवली होती. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे अशीच तलवार नाचवल्याप्रकरणी शिंदे गटाच्याच अभिजीत जीवनवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. इम्तियाज जलील यांनी या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मिरवणुकीत तलवार नाचवल्याप्रकरणी गरीब नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण संजय शिरसाट यांच्या मुलीवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. कायदा व न्याय श्रीमंतांना वेगळा व गरिबांना वेगळा असतो का? असे ते म्हणालेत.Imtiaz Jaleel
संजय शिरसाट यांची दोन्ही मुले विजयी
उल्लेखनीय बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत संजय शिरसाट यांची सिद्धांत व हर्षदा ही दोन्ही मुले विजयी झालेत. सिद्धांत शिरसाट हे प्रभाग क्रमांक 29 अ मधून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांची लढत भाजपचे भगवान गायकवाड व ठाकरे गटाच्या किशोर साबळे यांच्याशी होती. येथील अतितटीच्या लढतीत सिद्धांत यांचा विजय झाला. दुसरीकडे, हर्षदा शिरसाट या प्रभाग क्रमांक 18 अ मधून महापालिकेच्या रणांगणात होत्या. त्यांचा सामना भाजपच्या मयुरी बर्थने यांच्याशी होता. हर्षदा यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे संजय शिरसाट यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक बनली होती. त्यात हर्षदा यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना धोबीपछाड देत विजय मिळवला. यामुळे शिरसाट यांना मोठा दिलासा मिळाला.
शिंदे गटाने मालेगावात एमआयएमचा पाठिंबा मागितला -जलील
दुसरीकडे, इम्तियाज जलील यांनी मालेगाव महापालिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एमआयएमचा पाठिंबा मागितल्याचा दावाही केला आहे. तीन-चार महापालिकेत एमआयएमला अनुकूल परिस्थिती आहे. काँग्रेसने एका ठिकाणी आमचा पाठिंबा मागितला आहे. शिंदे गटानेही मागितला आहे. पण आम्ही त्याला स्पष्ट नकार दिला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मालेगावसारख्या ठिकाणी शिंदेंसोबत जाार नाही. ते भाजपसोबत सत्तेत आहेत. भाजप व शिदे गटाला वगळून चांगले अलायन्स करता येत असेल तर त्याचा अहवाल आम्हाला पाठवा अशा सूचना आम्ही आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App