विशेष प्रतिनिधी
पुणे : एमपीएसएसी पास झालेला विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. त्यावरून महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संताप उसळला असून फक्त पैसे गोळा करण्यासाठी सरकार असले उद्योग करतेय का, असा सवाल आता करण्यात येतो आहे.MPSC student swapnil lonkar suicide; his father – mother demands recuritment for students
दरवर्षी भरती निघते, जागा असते म्हणून निघते ना? की फक्त पैसे गोळा करण्यासाठी असले उद्योग सरकार करते का?, असा सवाल स्वप्नीलच्या आई छाया लोणकर यांनी विचारला आहे.
आता जर आमच्या स्वप्नीलला न्याय द्यायचा असेल तर भरती करा, अशी मागणी छाया लोणकर यांनी केली आहे. लवकरात लवकर भरती केली, तर अनेक स्वप्नील वाचतील. आणि भरती झाली नाही तर असे अनेक स्वप्नील जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
अमित ठाकरे यांनी आज लोणकर कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर म्हणाले, की आशा भेटी देऊन आमचा प्रश्न सुटणार नाहीत. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर आता आयुष्यभर आम्हाला रडतखडत जगावे लागेल.
आम्हाला भेटण्यापेक्षा भरती करा आणि विद्यार्थ्यांना नोकरी द्या. आम्हाला आमचा मुलगा नोकरीला लागला असे वाटेल. आमच्या मुलांचे बलिदान झालेय, त्यामुळे आता तरी सगळ्यांना जाग यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App