विशेष प्रतिनिधी
नगर : पेट्रोल, डीझेल महागले तर काय झाले, त्याबदल्यात मोफत सुविधा आणि लस मिळत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचे फलक लावताना पंतप्रधान मोदी यांनी लस मोफत दिली त्याचादेखील फलक झळकवा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे.MP Sujay Vikhe-Patil said, We are getting free facilities and vaccines.”
डॉ. विखे पाटील फाउंडेशन रुग्णालायच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ते म्हणाले, दरवाढीच्या बदल्यात मोफत सुविधा पाहाव्यात. केंद्र सरकार 35 हजार कोटी रुपये खर्च करुन मोफत लसीकरण मोहीम राबवत आहे. हे काम राज्य सरकारचे असून त्यांनी ते केले नाही. त्यामुळे इंधन दरवाढीच्या विरोधात फलक लावताना पंतप्रधानांनी मोफत लस दिली म्हणून त्याचेही फलक लावा.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून आलबेल नसल्याचे दिसत आहे. परंतु, हे सर्व नाटक असून आपले अपयश झाकण्यासाठी ते करत आहे. यामुळे जनता आणि प्रसार माध्यमांचे लक्ष विचलित करण्याचा डाव आहे. अस्तित्वाची लढाई म्हणून हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहे त्यामुळे ते सहजासहजी वेगळे होणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App