” अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय, हीच भावना ठेऊन त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे.”MP Amol Kolhe’s statement, said – ‘I want to see Ajit Dada as the Chief Minister …
विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत कोल्हे यांनी अजित पवारांबाबत वक्तव्य केलं आहे. अमोल कोल्हे म्हणाले की , ” अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय, हीच भावना ठेऊन त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे.”
पुढे अमोल कोल्हे म्हणाले की पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आली आहे .
तसेच देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवारांना पाहायचं असेल तर त्या माझ्या सर्वोच्च नेत्याला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये. यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण साहेबांना दाखवून दिली पाहिजे, असं आवाहन ही कोल्हे यांनी केलं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App