महाराष्ट्र शासन आणि नाम फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार; ग्राम प्रणालीतून ग्रामीण भागाचा विकास साधणार!!

Naam Foundation

विशेष प्रतिनिधी

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे महाराष्ट्र शासन आणि ‘नाम फाऊंडेशन’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत ग्राम प्रणालीतून ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडीमार्ग, शीव रस्ते, पाणंद रस्ते तयार केले जाणार आहेत. Naam Foundation

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एकत्र येऊन नाम फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत अनेक विकास कामे केलीत. यापुढे महाराष्ट्र शासन आणि नाम फाउंडेशन एकत्र येऊन ग्रामीण भागाचा विकास करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात‌ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित सेवा पंधरवडा राज्यस्तरिय शुभारंभ कार्यक्रमादरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या विविध प्रकल्पांचे उदघाटन केले. त्यांनी कार्यक्रमस्थळी विविध स्टॉल्सला भेट देत, सेवाकार्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे गृहराज्यमंत्री योगेश कदम, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते.

MoU between Maharashtra Government and Naam Foundation;

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात