विशेष प्रतिनिधी
मुंबई : Yogesh Kadam पुण्यातील कुख्यात गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेतल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम अडचणीत आले आहेत. गुंड नीलेश घायवळच्या भावाला म्हणजे सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे योगेश कदम सध्या चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी नकारघंटा वाजवल्यानंतरही कदम यांनी ही फाईल पुढे रेटली. त्यामुळे आता त्यांच्यावर विरोधकांनी विशेषतः ठाकरे गटाने टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणी त्यांचे वडील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी त्यांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला. आता योगेश कदम यांनी स्वतः एक्सवर एक पोस्ट शेअर करत आपले मत व्यक्त केले आहे.Yogesh Kadam
योगेश कदम म्हणाले, 2019 पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काहीजण करत आले. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, परंतु तेव्हादेखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केले, त्यालाच ताकद देण्याचे काम काहीजणांनी केले. स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काहीजण तेव्हापासूनच करत होते.Yogesh Kadam
माझ्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ
पुन्हा 2024 च्या निवडणुकीत माझ्या कुटुंबियांचा स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याइतपत राजकारणाची पातळी घसरली गेली. मला पराभूत करण्यासाठी त्यांनी समाज, पैसा आणि जातीच्या आधारावर गलिच्छ राजकारण करण्याचे अनेक प्रकार केले. माझी वैयक्तिक बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या खाजगी आयुष्यातदेखील ढवळाढवळ करण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला. तरीदेखील, दुसऱ्यांदा जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले. माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला मंत्रीपद दिले. साहजिकच, ज्यांना मला आमदार म्हणून पाहण्याचीही इच्छा नव्हती, त्यांना मी मंत्री झालो हे कसे बघवणार!
माझी इमेज डॅमेज करण्याचे प्रयत्न
गेल्या सहा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आजवर माझ्यावर कोणीही गुंड किंवा भ्रष्ट प्रवृत्तीचे समर्थन केल्याचे आरोप देखील करू शकले नाहीत. तरीसुद्धा काही ठराविक मंडळी माझी इमेज डॅमेज होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याच्या नादात, राजकारणात सक्रिय नसलेल्या माझ्या आईलादेखील या राजकारणात ओढून नीचपणाचा कळस गाठला गेला. व्यक्तीबद्दल मनात असलेला द्वेष काहीजणांना राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर घेऊन येईल, अशी कल्पनादेखील केली नव्हती.
असो, राजकारणात सर्वच गोष्टींचा ‘सामना’ करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही. मी माझे काम, माझी जबाबदारी आणि माझे कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत आहे आणि पुढेही तसेच निभावत राहणार आहे. शेवटी असेच म्हणावे वाटते की, “छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असे नाही”, असे योगेश कदम यांनी ट्विट करत म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App