वृत्तसंस्था
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी सकाळी आली. या धमकीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार केली. पवारांचे काही बरे वाईट झाले तर त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्यातले गृह मंत्रालय जबाबदार असेल असे वक्तव्य केले त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये ट्विटर वॉर रंगले.morning threatening episode; talk all day; Pawar in front of the media before evening
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली पवारांच्या बंगल्या भोवतीचा सुरक्षा घेरा वाढविला. पवारांच्या सुरक्षेची ग्वाही त्यांनी दिली स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पवारांच्या सुरक्षा संबंधी पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली त्याचवेळी ट्विटरवरून त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर बिथरलेल्या लोकांना इशाराही दिला.
दरम्यानच्या काळात आज दिवसभर फक्त शरद पवारांना आलेली धमकी, त्यांची सुरक्षा, त्यावरून झालेले राजकीय आरोप – प्रत्यारोप हा विषय मराठी माध्यमांनी चालविला.
इस राज्य के प्रत्येक नागरिक को संविधान के अनुसार किसी भी पार्टी के बारे में अपने विचार व्यक्त करने का अधिकार है, ऐसे में अगर कोई यह सोचता है कि वह धमकियों से आवाज बंद कर सकता है तो यह गलतफहमी है। मुझे सिस्टम और पुलिस की क्षमताओं पर पूरा भरोसा है जो कानून व्यवस्था बनाए रखने के लिए… pic.twitter.com/KhD1PRitkD — ANI_HindiNews (@AHindinews) June 9, 2023
इस राज्य के प्रत्येक नागरिक को संविधान के अनुसार किसी भी पार्टी के बारे में अपने विचार व्यक्त करने का अधिकार है, ऐसे में अगर कोई यह सोचता है कि वह धमकियों से आवाज बंद कर सकता है तो यह गलतफहमी है। मुझे सिस्टम और पुलिस की क्षमताओं पर पूरा भरोसा है जो कानून व्यवस्था बनाए रखने के लिए… pic.twitter.com/KhD1PRitkD
— ANI_HindiNews (@AHindinews) June 9, 2023
… आणि सायंकाळ होण्यापूर्वी स्वतः शरद पवार माध्यमांसमोर आले. जीवे मारण्याच्या धमक्या देऊन आपला आवाज कोणी बंद करून पाहत असेल, तर त्यांना ते शक्य नाही असल्या धमक्यांना आपण भीक घालत नाही. आपला या देशातल्या सिस्टीमवर आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे, असे वक्तव्य पवारांनी माध्यमांसमोर केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App