200 आमदार सरकारच्या पाठीशी, त्यामुळे ठाकरे – पवारांना पोटदुखी; एकनाथ शिंदेंची फटकेबाजी!!

प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीला धोका निर्माण झाल्याचा नॅरेटिव्ह पसरविणाऱ्या ठाकरे पवारांच्या नेत्यांना आणि मराठी माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोला आणलेला आहे 200 पेक्षा जास्त आमदार आमच्या सरकारच्या पाठीशी आहेत त्यामुळे विरोधकांना पोटदुखी झाली आहे, शब्दात एकनाथ शिंदे यांनी ठाकरे पवारांच्या पक्षांचा समाचार घेतला आहे. More than 200 mlas supports shinde fadnavis government, no question of quitting chief ministership, says eknath shinde

अजित पवारांसोबत 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसंच आपल्याला 40 पेक्षा जास्त राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवारांच्या गटाने केला. या घडामोडींनंतर शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता आहे तसंच एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावा लागेल, असा दावा ठाकरे गटाने केला. काही मराठी माध्यमांनी तो नॅरेटिव्ह चालवला. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनाम्याच्या या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसंच त्यांनी ठाकरे – पवारांवर निशाणा साधला.

एकनाथ शिंदे म्हणाले :

– अजितदादांनी विकासाला साथ दिली, ते प्रभावित झाले. त्यांनी युतीत यायचा निर्णय घेतला तेव्हा भाजपने आम्हाला विश्वासात घेतले. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेला पुढे नेत आम्ही विकास करत आहोत. अजितदादांनी स्वीकारले की मागच्या एका वर्षात विकास झाला आणि आम्ही विकासाला साथ देत आहोत. राज्यात डबल इंजिन सरकार आहे अजितदादांचेही ते विचार आहेत.


‘’आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो…’’ शरद पवारांवर निशाणा साधत अजित पवारांचा संतप्त सवाल!


ठाकरे – पवारांना टोला

माझ्या राजीनामाच्या अफवा आहेत. तुम्ही कोणत्या थराला जाल, तुमच्या पक्षाची हालत बघा, आत्मचिंतन करा. दुसऱ्यांच्या घरात डोकावण्यापेक्षा तुमचे घर शाबूत आहे का ते बघा. तुमचे घर तुटले आहे तुमच्या या वागणुकीमुळे.

माझी शिवसेना नेत्यांसोबत बैठक झाली. हे बेरजेचे राजकारण आहे. सरकार स्थापन झाले तेव्हापासून ठाकरे – पवारांचे तेच सुरू आहे. पण आमचा तिन्ही पक्ष मिळून 200 च्या वर आकडा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आम्हाला पाठिंबा आहे. अमित शाह कायम लक्ष देतात. आमच्या प्रस्तावांना मान्यता देतात. हे सरकार मजबुतीने काम करत आहे, त्यामुळे यांच्या पोटात दुखत आहे.

अजित पवार आल्यामुळे सरकार आणखी मजबूत झाले. आमचं सरकार सर्वसामान्यांच्या भल्यासाठीचे सरकार आहे. मी ही सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्याचा मुलगा. राज्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामं सुरू आहेत. लोकांना काम आणि विकास पाहिजे, यासाठीच अजित पवार आले आहेत. घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांकडे कोण जातं का? ही अफवा आहे, संपर्कात कोण आहे त्यांची नावं सांगावीत. गुवाहाटीला असल्यापासून ते हेच बोलतायत.

 जागा वाटपाचा फॉर्म्युला

लोकसभेमध्ये आमच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकू. विधानसभेत आताच आमच्याकडे 200 पेक्षा जास्त आमदार आहेत. ऐतिहासिक रेकॉर्डब्रेक निवडणुका होतील, म्हणून ते घाबरले आहेत. जे आहेत त्यांच्या जागा तशाच राहतील, उरतील त्यामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेऊ.

More than 200 mlas supports shinde fadnavis government, no question of quitting chief ministership, says eknath shinde

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात