पवारांची राष्ट्रवादी भंजाळली; सुप्रिया सुळे म्हणाल्या, EVM घोळ नाही; उत्तम जानकर म्हणाले, 150 मतदारसंघांत EVM घोटाळा!!

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतल्या धारून पराभवानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पुरती भंजाळली आहे. निवडणुकीतल्या पराभवाचा धक्का एवढा मोठा आहे की, पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना त्याची खरी कारणे पचवताच येत नाहीयेत. त्यामुळे पराभवाचे खापर त्यांनी सुरुवातीलाच EVMs फोडले, पण नंतर त्यातला खोकलेपणा लक्षात आल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी EVMs मध्ये कोणताही घोळ नसल्याची आणि त्याचा पुरावा नसल्याची कबुली दिली.

पण आता त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांनी बारामतीत जाऊन शरद पवारांची भेट घेऊन महाराष्ट्रात 150 विधानसभा मतदारसंघांमध्ये EVMs घोटाळा झाल्याचा आरोप केला. इतकेच काय, पण बारामती मध्ये अजित पवार तब्बल 20000 मतांनी पडले, असा अजब दावा करून सुप्रिया सुळे यांना अडचणी आणले. कारण सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या विरोधातले उमेदवार त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना फेरमतमोजणीचा अर्ज मागे घ्यायला लावला. या सगळ्या प्रकारात शरद पवारांची राष्ट्रवादीपूर्ती भांजाळली आणि EVMs विरोधात आपण नेमके काय करायचे याची विवेक बुद्धी हरवून बसली.

उत्तम जानकरांनी आज शरद पवारांची बारामतीत जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी दीडशे मतदारसंघांमध्ये EVMs घोटाळा झाल्याचा दावा केला. अजित पवार 20000 मतांनी पडले. जयकुमार गोरे 30000 मते चोरली. प्रत्यक्षात ते 13000 मतांनी पडले. 288 मतदारसंघांपैकी भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे मिळून 107 आमदार निवडून आले, तर अजित पवारांचे फक्त 13 आमदार निवडून आले आहेत, असा अजब दावा उत्तम जानकरांनी केला.

शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे मिळून ही आकडेवारी घेऊन निवडणूक आयोगाला भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे मारकडवाडीत येणार असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.

More confusion in NCP SP about EVMs

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात