विशेष प्रतिनिधी
भोपाळ : अनोळखी मुलगा एखाद्या हिंदू मुलीला भुलवू शकतोच कसा??, यात आपण समाज म्हणून कमी पडतो आपला घरातला संवाद कमी पडतो. संवाद वाढवा. घरात विश्वास निर्माण करा आणि Love Jihad करणाऱ्याच्या विरोधात कायद्याच्या कठोर बडगा वापरा, अशा स्पष्ट शब्दांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लव्ह जिहादवर त्रिसूत्री मांडली. Mohan Bhagwat
कुटुंबात पालक आणि मुलांमधील संवाद आणि त्यांच्यातील घट्ट नाते लव्ह जिहाद सारख्या घटना थांबवू शकतात, असे सरसंघचालक म्हणाले. जेव्हा घरात आणि कुटुंबात मुलांशी तुम्ही नियमित संवाद साधणार तेव्हा अशा घटनांवर अंकुश लागले. मुलांच्या भावना समजून घेता येतील. त्यामुळे या घटनांना आळा बसेल, असे भागवत म्हणाले. भोपाळ येथील शिवनेरी भवन येथ आयोजित स्त्री शक्ती संवाद या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी परखड भूमिका मांडली.
भागवत म्हणाले की, आपल्याला हे समजून घ्यायला हवे की अनोळखी व्यक्ती आपल्या मुलीला कसा भुलवू शकतो?? कुटुंबातील विसंवाद, सदस्यांमधील संवादातील कमी याचे या प्रकरणात मोठे योगदान आहे. जेव्हा कुटुंबात नियमित संवाद होईल. तुम्ही मुलांशी संवाद साधला तर त्यांना धर्म, संस्कृती आणि पंरपरांची माहिती होईल, त्यांच्याविषयीचा स्वाभाविक सन्मान समोर येईल.यावेळी त्यांनी लव्ह जिहाद थोपवण्यासाठी त्रिसूत्री सुद्धा सांगितली.लव्ह जिहाद थांबवण्यासाठी त्रिसूत्री काय?
सरसंघचालक मोहन भागवत यांनी Love Jihad थांबवण्यासाठी तीन महत्वपूर्ण उपाय सांगितले. ही त्रिसूत्री म्हणजे कुटुंबात नियमित संवाद, मुलींमध्ये सजगता आणि आत्मसुरक्षेची भावना निर्माण करणे आणि लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक संघटनांवर ही त्यांनी जबाबदारी निश्चित केली. अशा कोणत्याही घटनांबाबत सामाजिक संघटनांनी सजग राहावे. अशा घटनांच्या विरोधात समाजाने एकत्रित येऊन विरोध करावा, तेव्हाच Love Jihad सारख्या समस्येवर समाधानकारक तोडगा निघेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महिलांमुळे धर्म आणि संस्कृती सुरक्षित
जेव्हा समाज सभ्यतेचे गोडवे गातो, तेव्हा त्यात महिलांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते. आपला धर्म, आपली संस्कृती आणि सामाजिक व्यवस्था महिलांमुळे सुरक्षित असल्याचे भागवत म्हणाले. पुरुष आणि महिला हे दोन्ही मिळून समाजाला पुढे नेतात. त्यामुळे दोघांनी सजग राहणे आणि जागरुक राहणे आवश्यक असल्याचे भागवत म्हणाले. पाश्चिमात्य समाजातील स्त्रियांची स्थिती आणि भारतीय मातृत्व केंद्रीत समाज याची तुलना करत यामुळे भारतीय संस्कृती उंच स्थानी असल्याचे भागवत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App