आकासा एअर ही भारतीयांसाठी सर्वात जास्त परवडणारी आणि ग्रीनेस्ट एअरलाईन असेल. आकासा एअरलाइन्सच्या उपक्रमासाठी एअरबस या युरोपीयन विमान कंपनी सोबत विमान खरेदीच्या संदर्भात चर्चा सुरू आहे.Modi’s visit was beneficial; Jhunjhunwala got permission from the airline
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शेअर बाजारातील दिग्गज असलेले राकेश झुनझुनवाला यांच्या ‘अकासा एअर’ या विमान कंपनीला केंद्र सरकारने आज सोमवारी परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे नुकताच झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्वतंत्र भेट घेतली होती. याला आठवडा पूर्ण होत नाही तोच झुनझुनवाला यांच्या विमान कंपनीचा प्रस्ताव मंजूर झाला. यासाठीच झुनझुनवाला यांन ही भेट होती का अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे.
‘आकासा एअर’ची २०२२ च्या उन्हाळी सुटीपूर्वी विमान सेवा सुरु होणार आहे. आकासा एअरचे सीईओ विनय दुबे यांनी सांगितले की, “नागरी विमानोड्डाण मंत्रालयाने एनओसी दिल्याने आम्ही आभारी आहोत.आकासा एअरलाईन नियमात राहून सुरु करण्यासाठी रेग्युलेटरी ऑथोरिटीसोबत काम करणार आहोत.”
आकासा एअर ही भारतीयांसाठी सर्वात जास्त परवडणारी आणि ग्रीनेस्ट एअरलाईन असेल. आकासा एअरलाइन्सच्या उपक्रमासाठी एअरबस या युरोपीयन विमान कंपनी सोबत विमान खरेदीच्या संदर्भात चर्चा सुरू आहे.
या कंपनीची विमान उड्डाणे 2022 च्या उन्हाळ्यापासून सुरू होतील. राकेश झुनझुनवाला यांची या विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. ही विमानसेवा सर्वात स्वस्त भाडे असेल, असे झुनझुनवाला यांनी स्पष्ट केले आहे.
झुनझुनवाला हे चार वर्षांत नवीन एअरलाईन उपक्रमासाठी 70 एअरक्राफ्ट्स बनवण्याची योजना आखत होते, मात्र आता त्यांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता झुनझुनवाला या नवीन विमान कंपनीमध्ये सुमारे 35 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत.
याआधी उद्योगपती रतन टाटा यांच्या समूहातील टाटा सन्सने तोट्यातील एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी खरेदी केली. टाटा पुन्हा विमान सेवा सुरु करणार आहे. त्यामुळे झुनझुनवाला यांनीही हवाई सेवेत पदार्पण केल्याने आता देशांत विमान सेवेत स्पर्धा दिसून येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App