विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात आज घडलेल्या राजकीय भूकंपावर शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या असल्या तरी एका मुद्द्याकडे माध्यमांचा भाजप समर्थकांचे दुर्लक्ष झाले आहे, ते म्हणजे महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019 मध्ये मांडलेली मूळ योजना 2023 मध्ये फलद्रूप झाली आहे. Modi’s original plan for 2019 has come to fruition; BJP – Shiv Sena – NCP unite in Maharashtra
देवेंद्र फडणवीस यांच्या एका मुलाखतीत 2019 च्या मूळ योजनेचा खुलासा झाला होता. शिवसेना – भाजप एकत्र असले तरी, तुम्ही राष्ट्रवादीला बरोबर घ्यायला हरकत नाही. तुम्ही काँग्रेसला एकाकी पाडा, असे पंतप्रधान मोदींनी आम्हाला सूचित केले होते, असे देवेंद्र फडणवीस त्यावेळी मुलाखतीत म्हणाले होते. आज दोन जुलै 2023 रोजी अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या राष्ट्रवादीच्या 8 मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यावेळी ही मूळ योजनाच फलदरूप झाल्याचे स्पष्ट होत आहे.
भले त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटले असतील, तरी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हा मूळ पक्ष उद्धव ठाकरे या मालकांपासून हिरावून घेतला आहे, तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याबरोबरच असल्याचा दावा करत आहेत. राष्ट्रवादीचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी अर्थात आमदार आपल्याबरोबर असल्याचे अजित पवारांनी सह्याद्री वरच्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांनी नेमलेले कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि अजित पवारांबरोबर शपथ घेतलेले मंत्री छगन भुजबळ हे होते. या तिन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपली आहे.
राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह आपलेच आहे आणि भविष्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप शिवसेना युतीबरोबर तिसरा पार्टनर म्हणून लढवण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे, असे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीवर अजित पवारांचा दावा लोकप्रतिनिधींच्या संख्येच्या आधारे पक्का मानला जात आहे.
याचा अर्थच पंतप्रधान नरेंद्र मोदींची 2019 मधली मूळ योजना 2023 मध्ये फलद्रूप झाली आहे. त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसला एकाकी पाडण्यासाठी जी सूचना मोदींनी केली होती, त्याची अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस यांनी आज करून दाखवली. अर्थात त्यासाठी ठाकरे आणि पवार या मूळ मालकांच्या दोन पक्षांमध्ये फूट पाडणे त्यांना भाग पडले, हा भाग अलहिदा…!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more