प्रतिनिधी
कोल्हापूर : नगरच्या फकीरवाड्यात औरंगजेबाचे पोस्टर नाचवले त्यानंतर कोल्हापूरत काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवले या औरंग्याच्या प्रेमाविरोधात कोल्हापूर मध्ये आज कडकडीत बंद आहे.
कोल्हापुरातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी एकजूट करत हा बंद पुकारला आहे आणि त्याला कोल्हापूरकरांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला आहे. औरंग्याच्या प्रेमामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांनी 19 जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
हिंदूत्ववादी संघटना आक्रमक
औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज आंदोलन पुकारले. सकाळी 11.00 वाजेपासून शिवाजी चौक परिसरात हिंदूत्ववादी संघटनांनी एकत्र परिसर दणाणून सोडला. मात्र, आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
कोल्हापूर कडकडीत बंद
तसेच, आज (बुधवार) हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली. त्यानुसार आज कोल्हापूर कडकडीत बंद आहे. हा बंद मागे घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने हिंदुत्ववादी संघटनांना केले. परंतु हिंदुत्ववादी संघटना बंदवर ठाम राहिल्या. त्यामुळे आज सकाळपासून शहरातील व्हिनस कॉर्नर परिसरासह अन्य ठिकाणी शुकशुकाट आहे.
नेमके झाले काय?
कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे हद्दीतील काही तरुणांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे काही आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडण्याचे नाकारता येत नसल्याने बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App