विशेष प्रतिनिधी
मुंबई: कोरोना संकटा पाठोपाठ महाराष्ट्रात आणखी एक संकट आले . तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना मोठा फटका बसला . या चक्रीवादळामुळे खुप प्रमाणात नुकसान देखील झाले.संकट काळात घरा बाहेर न पडणार्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनसेने पत्रकार परिषदेत फैलावर घेतले .पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेत आहेत. मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंनी मुंबईतील नुकसान झालेल्या भागाचा आढावा घेण्यासाठी तरी बाहेर पडावे अशा शब्दांत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे .MNS press conference: ‘Raj’ Sena slams Shiv Sena commenting on Prime Minister Modi’s Gujarat tour
संजय राऊत म्हणजे सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमधील तिवारीच्या पात्राप्रमाणे आहेत. त्यांना ‘अहं ब्रह्मास्मि’चा भास होतो, ते त्याच थाटात वावरत असतात, असा टोला देखील संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. त्यावरुन ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्यावर खोचक टिप्पणी करणाऱ्या शिवसेनेचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे. पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत.
महाविकासघाडीच्या नेत्यांनी सोडून इतरांनी काहीही केले तर ते राजकारण
सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी काहीही केले तरी ते माफ असते. त्याशिवाय आणखी कोणत्या पक्षाने काही केले तर ते राजकारण ठरते, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App