‘’पदं येतात जातात पण…’’ रत्नागिरीत मनसैनिकांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंचं विधान!

‘’… हा माझा तुम्हाला आणि महाराष्ट्राला शब्द आहे’’ असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोकण  दौऱ्यावर आहेत. काल ते रत्नागिरीत होते. यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. याबाबत राज ठाकरेंनी स्वत: ट्वीटद्वारे माहिती दिली. राज ठाकरे म्हणतात, ‘’माझ्या दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यात आज मी रत्नागिरीत माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला. रत्नागिरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत एक नवीन फळी कार्यरत झाली आहे, त्यांच्याशी आज संवाद साधला.’’ MNS President Raj Thackerays guidance to Ratnagiri workers

याचबरोबर ‘’माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी एकमेकांशी पदांनी नाही तर मनांनी संवाद साधला पाहिजे. पदं येतात जातात पण मनं जुळलेली असतील तर संवाद, स्नेह कायम टिकतो, माझी ही त्यांच्याकडूनची अपेक्षा व्यक्त केली. सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल मी त्यांना सांगितलं की “राज्यात सध्या जो राजकीय व्याभिचार सुरु आहे तो मी करणार नाही. मला अशा प्रकारची तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण असली तडजोड करणार नाही. हा माझा तुम्हाला आणि महाराष्ट्राला शब्द आहे.” असंही यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं.

याशिवाय,  “महाराष्ट्रातल्या जनतेला जो काही राजकीय तमाशा सुरु आहे तो अजिबात आवडत नाहीये, फक्त त्यांनी त्यांच्या मनातील राग, खदखद आता व्यक्त केली पाहिजे. हीच आता शेवटची आशा आहे.” असंही राज ठाकरे म्हणाले.

तर “महाराष्ट्रात जिथे नाका तिथेच मनसेची शाखा असायला हवी. रस्त्यावरून जाणाऱ्या माता-भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे कि इथे ह्या नाक्यावर मनसेची लोकं उभी आहेत मला कुणीही हात लावणार नाही. लोकांच्या अडी-अडचणीला लगेच धावून जाता आलं पाहिजे इतका जनसंपर्क वाढवा. लोकांचा आपल्यावर विश्वास आहेच फक्त लोकांची मनं जिंकूया. जनता आपल्याला भरभरुन आशीर्वाद देईल.” अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं.

MNS President Raj Thackerays guidance to Ratnagiri workers

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात