प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचा पारा चढून त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर तुफान आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर त्यांना मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी “मनसे थेरपी” घेण्याचा खोचक सल्ला दिला आहे, अन्यथा संजय राऊत यांच्यावर पवार – पवार म्हणत रस्त्यावर फिरण्याची वेळ येण्याचा टोलाही त्यांनी हाणला आहे!!
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना एक पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंट वरून व्हायरल देखील केले आहे. राऊतांची या पत्रावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. पण सध्या सोशल मीडियावर या “मनसे थेरपीची” जोरदार चर्चा सुरू आहे.
– संदीप देशपांडे यांचे नेमके पत्र काय??
तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजीपोटी हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चीडचीड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चीडचीड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. तुम्ही कितीही नाकारलं तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी.
आपण दररोज जी पत्रकार परिषद घेता, त्या ऐवजी दोन दिवसांतून एकदा पत्रकार परिषद घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का? ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या १० ते १५ मिनिटे पूर्वी योगा करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल.
शिवसेनेच्या ऱ्हासाला उद्धव ठाकरे जबाबदार
सर्वात महत्वाचे म्हणजे आपणच सगळ्यांना पवार साहेबांच्या नादी लावले आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली, ही सल तुम्ही मनाला लावून घेतली आहे. ती पहिली आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही तेवढेच जबाबदार आहेत, हे लक्षात घ्या, नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर ‘पवार…पवार’ असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल.
कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच! पटलं तर घ्या, नाही पटलं तर चु%^* आहे असं म्हणून विसरून जा
संदीप देशपांडे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App