प्रतिनिधी
मुंबई : मनसेचे नेते तसेच माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. मॉर्निंग वॉकसाठी ते जात असताना शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आल्याचे सांगण्यात येत आहे. संदीप देशपांडे यांना बेदम मारहाण करून हल्लेखोरांनी पोबारा केला. या हल्ल्यामध्ये संदीप देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.MNS leader Sandeep Deshpande fatally attacked, beaten with iron rod, stump during morning walk; admitted to hospital
नेहमीप्रमाणे संदीप देशपांडे मॉर्निंग वॉककरिता शिवाजी पार्कमध्ये गेले होते. यावेळी अचानक काही मास्कधारी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही. ते जखमी होऊन खाली पडले. या हल्ल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर स्थानिकांनी देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. संदीप देशपांडे जबर जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ल्याची माहिती मिळताच मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हिंदुजा रुग्णालयाकडे धाव घेतली
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App