‘’… याची जाणीव झाल्यामुळे ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न तर चालू नाहीना?’’

Sandeep deshpande and Uddhav Thakrey

मनसे नेते संदीप देशपांडे यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतच, आपण ठाण्यात निवडणूक लढून जिंकून दाखवू, असं विधान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आव्हान दिलं. त्यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावरून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. MNS leader Sandeep Deshpande criticizes Aditya Thackeray

‘’वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज आहे. आपण पुन्हा वरळीतून निवडून येणार नाही याची जाणीव झाल्यामुळे ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न तर चालू नाहीना??? ’’ असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटद्वारे विचारला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया –

तर आदित्य ठाकरेंनी केलेल्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फारसं भाष्य करणं टाळलं. लोकशाहीने सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे, त्यामुळे मी त्यावर काय बोलणार? असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर अधिक काही बोलणं टाळलं. मात्र शिवसेना(शिंदे गट) नेते आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर प्रतिक्रिया देत आहेत. वरळीतून निवडून येणे आता शक्य नसल्याने आदित्य ठाकरे ठाण्याचा विचार करत आहेत, असं हे नेते म्हणत आहेत.

संजय राऊत काय म्हणाले? –

दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण राज्यात सध्या ज्या पद्धतीचे वातावरण आहे. ते पाहता आदित्य ठाकरे कुठेही निवडणुकीसाठी उभा राहिले तरी ते निवडून येतील. मग ते मुंबईत राहु द्या किंवा ठाण्यात नाहीतर महाराष्ट्रात कुठेही निवडणूक लढवली तरी ते निवडून येतील. असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

MNS leader Sandeep Deshpande criticizes Aditya Thackeray

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात