ठाकरे बंधूंची युती जाहीर, पण जागावाटपाचा सस्पेन्स कायम ठेवून!!; पण तो “सस्पेन्स” का ठेवावा लागला??

नाशिक : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित अशी ठाकरे बंधूंची युती आज जाहीर झाली, पण दोघांनीही जागावाटपाचा सस्पेन्स कायम ठेवला. युती जाहीर करण्यापूर्वी उद्धव ठाकरे मातोश्रीतून निघून राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे गेले. तिथे राज ठाकरे यांच्या मातोश्रींनी दोघा बंधूंचे औक्षण केले. त्यानंतर ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केले. त्यानंतर ते दोघेही एकाच गाडीतून हॉटेलवर पोहोचले. तिथे त्यांनी ठाकरे बंधूंची युती झाल्याचे जाहीर केले. पण दोघांनीही जागावाटपाचे तपशील जाहीर केले नाहीत.

ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना आपल्या शेजारी बसवून घेतले. संजय राऊत यांनी थोडक्यात प्रस्तावना केली. त्यानंतर उद्धव ठाकरे बोलले. त्यांच्यानंतर राज ठाकरे बोलले. भाजपला हवे ते त्यांनी करावे मराठी माणसाला हवे ते आम्ही करतोय. मराठी माणसाला ठाकरे बंधूंची युती हवी होती ती आज आम्ही जाहीर केली. नाशिक मध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती आधीच जाहीर झालीय. मुंबईतही आम्ही युती म्हणूनच निवडणूक लढवू. ज्यांना उमेदवारी द्यायची त्यांना देऊ मुंबईचा महापौर मराठीच करू, असे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जाहीर केले.

त्यानंतर स्टेजवर फोटोसेशन झाले. या फोटोसेशन मध्ये ठाकरे बंधूंनी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे शर्मिली ठाकरे तसेच ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा वैद्य यांनाही सामील करून घेतले.

जागावाटप जाहीर न करण्याची कारणे

– ठाकरे बंधूंनी मोठी राजकीय वातावरण निर्मिती करून आज युती जाहीर केली. याचा सगळीकडे महाराष्ट्र जल्लोष करतोय असे मराठी माध्यमांनी दाखविले. पण ठाकरे बंधूंनी शिवसेना आणि मनसे यांचे जागावाटप जाहीर केले नाही. कारण त्यांची अजूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा सुरू आहे.

– काँग्रेसने ठाकरे बंधूंपासून आंतर राखले आहे. त्यामुळे काँग्रेसला कुठल्या जागा सोडायचा प्रश्नच उद्भवत नाही. पण यदा पदाची शरद पवारांनी युती केली, तर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला काही जागा सोडाव्या लागतील.

– त्याचबरोबर मुंबईतल्या कम्युनिस्ट पक्षाने किंवा अन्य छोट्या पक्षाने ठाकरे बंधूंच्या बरोबर यायची तयारी दाखविली, तर त्यांनाही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या जागा सोडाव्या लागतील.

– ठाकरे बंधूंनी जागावाटप जाहीर केले आणि त्यांचे उमेदवारच कोणी विशेषतः भाजपने पळविले तर त्यातून गोची व्हायला नको, असे ठाकरे बंधूंना वाटले.

– या सगळ्या कारणांमुळे ठाकरे बंधूंनी युती जाहीर केल्यानंतर सुद्धा जागा वाटपावर सस्पेन्स कायम ठेवला. त्यांनी जागावाटपाचा आकडा जाहीर केला नाही. उमेदवारांची नावे जाहीर करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.

MNS Chief Raj Thackeray announces the alliance of Shiv Sena (UBT) and MNS ahead of the Municipal Corporation Elections.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात