याआधी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती.MLA Sadabhau Khot slammed the state government for putting up shop signs in Marathi, saying ….
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आले असून, 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने, आस्थापनांनाही ही मराठी पाट्यांची सक्ती लागू करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी हा निर्णय घेतला.या पाट्यांवर मराठीतील म्हणजे देवनागरी लिपीतील अक्षरे इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही भाषेतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत.
दरम्यान हा निर्णय घेतल्यानंतर राजकिय वर्तुळात टिका-टिप्पणीला सुरुवात झाली आहे.आज रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व आमदार सदाभाऊ खोतयांनी राज्य शासनावर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी सोशल मीडियावरुन हल्लाबोल केला आहे.याआधी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती.
सदाभाऊ खोत म्हणाले की, “अहो दुकानावर मराठी पाट्या हव्यात पण मराठी शाळा नको! ह्याच सरकारनं प्राथमिक शिक्षण मराठीतून घेतलं म्हणून मराठी शिक्षक उमेदवारांना अपात्र ठरवलं.मराठीची पोकळ कळकळ जरा समजून घ्याच! हे मराठीचं दुटप्पी राजकारण आहे.अशी बोचरी टीका सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकावर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App