कोकणातील बहुतचर्चित चिपी विमानतळचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. हा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची या सोहळ्याला ऑनलाइन उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यावर भाजप आमदार नितेश राणे म्हणाले, “माझ्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतोय याचा अभिमान वाटतोय. कोकणातील जनतेला माहीत आहे की हे त्यांच्या दादानीच केलं आहे.” MLA Nitesh Rane Comment On Chipi Airport inauguration critisizes Shiv Sena
विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : कोकणातील बहुतचर्चित चिपी विमानतळचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. हा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची या सोहळ्याला ऑनलाइन उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यावर भाजप आमदार नितेश राणे म्हणाले, “माझ्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतोय याचा अभिमान वाटतोय. कोकणातील जनतेला माहीत आहे की हे त्यांच्या दादानीच केलं आहे.” आजचा क्षण आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री आले त्यांचं स्वागत अभिमानाने आम्ही करतोय, या कार्यक्रमाला गालबोट लागता कामा नये याची दक्षताही आम्ही घेऊ!
आ. नितेश राणे म्हणाले की, विमानतळाचं काम कोणी केलंय हे सांगायची गरज नाही. आधी शिवसेनेच्या वैभव नाईकांनी विरोध केला आणि नंतर ब्लास्टिंगचा ठेका मिळवला. शिवसेनेचे अरविंद सावंत केंद्रात मंत्री होते, मग त्यांनी का नाही परवानगी आणली? राणे साहेब केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांनी अवघ्या 60 दिवसात परवानगी आणली. बाळासाहेबांचा मुलगा आमच्या राणे साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी येतो हा बाळासाहेबांचा आम्हाला आशीर्वाद असल्यासारखा आहे. बाळासाहेब आज असते तर त्यांनी पाठीवर हात मारून सांगितलं असतं नारायण मला तुझा अभिमान आहे, अशी भावना नितेश राणे यांनी व्यक्त केली.
नितेश राणे पुढे म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी या विमानतळासाठी फॉलोअप घेतला होता. त्यांना निमंत्रण देण्याएवढी माणुसकीही यांच्यात नाही. म्हणून त्यांनी आणि प्रवीण दरेकरांनी बहिष्कार घातला आहे. याबाबत अधिक राणे साहेब आज बोलतील. चिपी विमानतळ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं होतं, पण त्याला छोटं केला त्यासाठी सर्वस्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई जबाबदार आहेत. विनायक राऊत यांनी त्यांच्या क्षमते एवढे बोलावं ते त्यांच्या तब्येतीसाठीही चांगलं आहे. मोदीं साहेबांमुळे ते दोनदा खासदार झाले आहेत. केंद्रात सत्ता असताना अरविंद सावंत मंत्री बनले पण विनायक राऊत यांना मंत्री बनविण्याचा उद्धव ठाकरे यांनी विचार केला नाही, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.
नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विशेष गिफ्ट दिल्याचं सांगितलं आहे. देवगड पुरळ हुर्शी गावातील अनेक शिवसैनिकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. कणकवली येथील नारायण राणेंच्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. नितेश राणे म्हणाले की, “व्हॅलनटाईनला उद्धव ठाकरे यांना असंच गिफ्ट दिलं होतं, आज ते आमच्या जिल्ह्यात येत आहेत, म्हणून हे गिफ्ट त्यांना समर्पित करत आहे. हे गिफ्टही त्यांना आवडेल.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App