‘’क्रूरकर्मा आफताबचा धर्म लपवून, कोणाचं कोंबडं झाकण्याचा प्रयत्न करताय?’’ निरंजन डावखरेंचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार!

‘’माझी पत्नी मुस्लीम असली, तरी ती … ’’ असंही निरंजन डावखरेंनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  लव्ह जिहाद धर्मांतर आणि लँड जिहादविरोधी कायदा पूर्ण देशभर लागू करण्याकरता अॅड.निरंजन डावखरे यांनी हिंदू जनजागरण धर्मसभेचे आयोजन केले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ज्या टीकेला निरंजन डावखरेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. MLA Niranjan Dawkhare replied to the criticism made by Jitendra Awad

निरंजन डावखरे म्हणतात, ‘’सकल हिंदू समाज’ एकत्र येतोय, ते पाहून जितेंद्र आव्हाडांना पोटदुखी झालीयं. `लव्ह जिहाद’ला अप्रत्यक्ष समर्थन करीत आव्हाडांनी धर्मांधाना दिलासा देण्याचा प्रयत्न केलांय. माझी पत्नी मुस्लीम असली, तरी ती सन्मानाने माझ्या कुटुंबात व समाजात जगतेयं. माझी मुले दिवाळी व ईदही जल्लोषात साजरी करतात. पण ते भाग्य श्रद्धा वालकरसह अन्य भगिनींना मिळाले नाही, हे दुर्देव.’’

‘’आव्हाडांनी सकल हिंदू समाजावर गळा काढण्याऐवजी दुर्देवी भगिनींचा बळी जाऊ नये, म्हणून काय केले? क्रूरकर्मा आफताबचा धर्म लपवून, कोणाचे कोंबडे झाकण्याचा प्रयत्न करताहेत! `लव्ह जिहाद’ऐवजी इंटर फेथ असा शब्द वापरून केवळ ३ हजार ६९३ प्रकरणे असल्याचे म्हणताहेत. अशा प्रकरणात बळी भगिनींच्या कुटुंबियांचे दुःख आव्हाडांना कळेल का? त्यांनी सोयिस्कर अंधत्व पत्करलंय.’’

‘’महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘शीव’ असा एकेरी उल्लेख करणाऱ्या आव्हाडांची मानसिकता किती किडलेली आहे, हे स्पष्ट दिसतेयं! नौपाडयाऐवजी डायघरमध्ये कार्यक्रम होत असल्याचे कोडं पडलेल्या आव्हाडांना `मुंब्रा-राबोडी’ का आठवली नाही? तुम्ही कितीही बोंबा मारा, आता `सकल हिंदू समाज’ एकवटणारच!’’

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? –

‘’आफताब आणि श्रद्धा वालकर या प्रकरणामध्ये शंभर टक्के आफताबला फाशी झालीच पाहीजे. पण, आफताब या नावाखाली गैरसमज पसरवणा-यांना मला एवढेच सांगायचे आहे की, आफताब हा पारसी आहे. ज्या उद्देशाने त्याचे नाव घेतले जाते, तो उद्देश हिनमनोवृत्ती दाखवणारा आहे. तसेच जर कुठेही लव जिहाद सारखी प्रकरणं असतील तर आम्ही तुमच्याबरोबर उभे राहू. मला नाही वाटत ठाण्यात एकही प्रकरण लव जिहाद चे झाले आहे.

शीव, फुले-शाहू-आंबेडकर ह्यांच्या महाराष्ट्रात कुठल्या ही महिला भगिनी ला होणारा त्रास कसा काय आम्ही सहन करू.पोलीसांकडे त्याबाबत काही नोंद आहे असे देखिल वाटत नाही. असेल तर पोलीसांनी तसे सांगावे. पण, निष्कारण त्यावरुन ठाण्यामध्ये तणाव निर्माण करणं हे काही योग्य आहे असे वाटत नाही. कुठलेतरी कारण काढून धार्मिक तेढ निर्माण करुन अशांतता पसरवणं ही मानसिक विकृती आहे आणि त्यामध्ये संपूर्ण देशाचे नुकसान होते. ठाण्यात काही पोस्टर्स लागली आहेत. ती पोस्टर्स वाचल्यानंतर असे वाटते की, हिंदू धर्मातील महिला भगिनींना सद्सदविवेक बुद्धीच नाही आणि त्या कधिही जाळ्यात फसू शकतात. मला यामध्ये कुठेही सत्यता वाटत नाही. माझ्या हिंदू भगिनी अत्यंत हुशार आहेत. त्यांची सद्सदविवेक बुद्धी जागृत आहे आणि आपल्या आयुष्याचं पुढे काय करायचं हा निकाल घेण्यासाठी त्या खूप समर्थ आहेत. त्यांच्या सामर्थ्याला कमी लेखू नका आणि ही पुरुषप्रधान संस्कृती त्यांच्यावर लादू नका.

जगातील सर्व धर्मातील महिला या शंभर वर्षांपूर्वी कश्या होत्या आणि शंभर वर्षांनंतर कश्या आहेत हे आपण जाणून आहोत. तेव्हा कुठल्याही वर्णाला, कुठल्याही वर्गाला तसेच स्त्री-पुरुषामध्ये भेदभाव न करता आपण सगळे सामान आहोत आणि बुद्धीजीवी आहोत एवढं लक्षात ठेवा. निरंजन.डावखरे ह्यानी एका मुस्लिम भगिनीशी विवाह केला आहे हे सामंजस्य वाढीला लागावे हीच इच्छा. हा कार्येक्रम नवपाड्यात न घेता डायघर ला का घेतला हे कोडे काही सुटत नाही.’’

MLA Niranjan Dawkhare replied to the criticism made by Jitendra Awad

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात