Sharad Pawar : आमदार चेतन तुपे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण..सांगितले हे कारण

Sharad Pawar

विशेष प्रतिनिधी

पुणे : Sharad Pawar राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र रयत शिक्षण संस्थेसंदर्भात शरद पवारांची भेट घेतली असे चेतन तुपे यांनी स्पष्ट केले आहे.Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांच्या कार्यालयामध्ये आज भेटीगाठीचे सत्र सुरू आहे. अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवारांच्या मोदी बागेतील निवासस्थानी भेट घेतली.



चेतन तुपे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात ज्या काही गोष्टी होत्या त्याबाबत ही बैठक होती. पश्चिम विभागातील ज्या शाखा आहेत त्याबद्दल चर्चा झाली. रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी आज शरद पवार यांच्या भेटीला आलो होतो .आता वर्ष संपत आहे आणि 25 सुरु होत आहे या वर्षात रयत शिक्षण संस्थेने काही उपक्रम राबवायचे ठरवले आहे त्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवारांनी आज वेळ दिली होती आणि त्या संदर्भात चर्चा देखील झाली

तुपे म्हणाले, माझे आणि शरद पवार यांचे कौटुंबिक संबंध आहेत. प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडू नये

महाराष्ट्राची संस्कृती आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध ठेवले पाहिजे. शरद पवार यांना आज रयत चे काही इतर लोकं सुद्धा भेटलेत.
दोन्ही पवार एकत्र येणार ? का या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना तुपे म्हणाले, दोन्ही पवार एकमेकांना भेटत आहेत, एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतायेत. त्यामुळे जर महाराष्ट्राची इच्छा असेल तर त्या प्रमाणे ते करतील.

MLA Chetan Tupe’s meeting with Sharad Pawar fueled the discussion

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात