‘’तुमच्या सर्व समावेशकतेने वसंतदादांचा गेम केला हा इतिहास कसा नाकाराल?’’ भातखळकरांचा पवारांना सवाल!

1978 मधील सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांच्यात  सध्या राजकीय घमासन सुरू आहे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातल्या 1978 मधल्या सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जे राजकीय घमासन सुरू आहे, यावरून आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे.  1978 मध्ये शरद पवारांनी “मुत्सद्देगिरी” करून वसंतदादांचे सरकार पाडल्याचा पवारनिष्ठ नॅरेटिव्ह निष्ठावंत माध्यमांनी सेट केला आहे, तो फडणवीसांनी उधळला आहे. तसेच, तसेच, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही शरद पवारांवर निशाणा साधला आहे. MLA Atul Bhatkhalkar criticizes Sharad Pawar

आमदार भातखळकर म्हणतात, ‘’वसंतदादांसोबत केलेल्या गद्दारीची देवेंद्र फडणवीसांनी आठवण करून दिली, ते शरद पवारांना खूपच झोंबलेले दिसते. ‘मी सर्वसमावेशक सरकारची स्थापना केली त्या सरकारमध्ये जनता पार्टी पण सामील होती’. असे पवार म्हणतात.  हो खरे आहे! परंतु पवारांनी स्वपक्षीय वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला हे कसे नाकारता येईल? तुमच्या सर्व समावेशकतेने वसंतदादांचा गेम केला हा इतिहास कसा नाकाराल?’’

आपण 1978 मध्ये सरकार बनवताना भाजपबरोबर सरकार बनवले, त्यावेळी फडणवीस प्राथमिक शाळेत होते. त्यामुळे त्यांना त्याची माहिती नसेल, असे वक्तव्य करून पवारांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली होती. पण फडणवीस त्या खिल्लीला बधले नाहीत. उलट त्यांनी पवारांना प्रत्युत्तर देताना आपण प्राथमिक शाळेत होतो की जन्मालाच यायचे होतो, यामुळे इतिहास बदलत नाही. तो तसाच राहतो. पवार काँग्रेस मधून निवडून आले. त्यांनी 1978 मध्ये वसंतदादांचे सरकार पाडले आणि भाजपबरोबर म्हणजे त्या वेळच्या जनसंघाबरोबर सरकार बनवले, हेच आपण सांगितल्याचे फडणवीस म्हणाले… आणि ती ती जर पवारांची “मुत्सद्देगिरी” असेल, तर एकनाथ शिंदे यांनी भाजप बरोबर निवडून येऊन मेरीटवर सरकार बनवले असेल तर ती “गद्दारी” कशी??, या प्रश्नाचे उत्तर पवारांनी देणे टाळले. कारण ते त्यांना गैरसोयीचे होते, असे खणखणीत प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले. फडणवीसांच्या या वर्मावर बोट ठेवणाऱ्या उत्तरातूनच उत्तरातूनच पवारनिष्ठ माध्यमांच्या नॅरेटिव्हला छेद गेला आहे.

MLA Atul Bhatkhalkar criticizes Sharad Pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात