मित्तल – अदानी दावोस मध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; अन्य कंपन्यांबरोबरही 40000 कोटींचे करार

विशेष प्रतिनिधी

दावोस : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिष्टमंडळाची विविध उद्योगपतींनी भेट घेतली. आर्सेलर मित्तल समूहाचे कार्यकारी अध्यक्ष लक्ष्मीनिवास मित्तल आणि अदानी समूहाचे संस्थापक अध्यक्ष यांनी आज महाराष्ट्र दालनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दोन्ही बड्या उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांशी महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींविषयी चर्चा केली.Mittal – Adani to visit CM in Davos; 40000 crore contracts with other companies as well



यावेळी त्यांच्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज लॉयड मेटल्स कंपनीने महाराष्ट्रासमवेत 39200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा महत्त्वाचा करार असून या प्रकल्पातून 11800 रोजगार निर्मिती होणार आहे.

बेल्जियम येथील एबीआयएन बेव्ह ही बहुराष्ट्रीय कंपनी महाराष्ट्रात 600 कोटी रुपये (७३ दशलक्ष डॉलर) ची गुंतवणुक करणार असून या सामंजस्य करारावरही मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे राज्यात शेकडो रोजगार निर्माण होण्यास मदत होणार असून ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

Mittal – Adani to visit CM in Davos; 40000 crore contracts with other companies as well

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात