Sumona Chakravarti : मराठा आंदोलकांकडून गैरवर्तन, दक्षिण मुंबईत अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचा धक्कादायक अनुभव

Sumona Chakravarti

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sumona Chakravarti  दक्षिण मुंबईसारख्या सुरक्षित व प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या भागातसुद्धा महिलांना दिवसाढवळ्या असुरक्षित वाटू शकते, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. लोकप्रिय अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने स्वतःचा भीषण अनुभव इन्स्टाग्राम पोस्टमधून शेअर केला असून, मराठा आंदोलकांकडून गैरवर्तन झाल्याचा आरोप केला आहे.Sumona Chakravarti

सुमोनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज दुपारी साडेबारा वाजता कोलाबाहून फोर्टकडे जाताना अचानक माझी कार आंदोलकांच्या जमावाने अडवली. भगवा अंगरखा घातलेल्या एका व्यक्तीने गाडीच्या बोनटवर जोरजोरात बडवायला सुरुवात केली. तो खिदळत माझ्याकडे पाहत होता आणि स्वतःचं पोट कारला टेकवत अश्लील हालचाली करत होता. त्याचे सोबती काचा बडवत “जय महाराष्ट्र” अशा घोषणा देत हसत होते. अवघ्या पाच मिनिटांत दोनदा हा प्रसंग घडला, पण तिथे ना पोलीस होते, ना कायदा-सुव्यवस्था दिसली. उलट दिसणारे काही पोलीस गप्पा मारत बसलेले होते.”Sumona Chakravarti



अभिनेत्रीने स्पष्ट केले की, मुंबईसारख्या महानगरात, तेही उजेडात, स्वतःच्या गाडीत बसले असताना तिला प्रचंड असुरक्षित वाटले.

सुमोनाने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय होती. केळीच्या साली, प्लास्टिकच्या बाटल्या, घाण यांचा ढीग रस्त्यावर साचला होता. फूटपाथवर आंदोलकांनी कब्जा केला होता. तिथेच ते खाणं, झोपणं, आंघोळ करणं, स्वयंपाक करणं, लघुशंका व मलमूत्र विसर्जन करणं, व्हिडिओ कॉल करणं, रील्स बनवणं, अगदी ‘मुंबई दर्शन’ करत असल्यासारखे वागत होते. आंदोलनाचा उद्देश काहीही असो, नागरी भानाचा अक्षरशः खेळखंडोबा होत होता.”

देशाच्या प्रगतीवर प्रश्न उपस्थित करत अभिनेत्री म्हणाली की, “आपण सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत असा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात तसं काही जाणवत नाही. जातिवाद, धर्म, भ्रष्टाचार, राजकारण, निरक्षरता आणि बेरोजगारी यांनी समाजाला जखडून टाकलं आहे. खरा विकास म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवनमानात सुधारणा, समान संधी आणि पारदर्शक व्यवस्था. पण आज जे घडतंय त्याला विकास नव्हे तर अधःपतन म्हणावं लागेल.”

सुमोना चक्रवर्तीच्या या पोस्टनंतर समाजमाध्यमांवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी मुंबईसारख्या शहरात महिलांना सुरक्षितता नाही हे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. आंदोलकांचा योग्य पद्धतीने निषेध होणे गरजेचे असल्याची मागणीही होत आहे.

Misconduct by Maratha Protesters: Actress Sumona Chakravarti’s Shocking Experience in South Mumbai

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात